थकबाकी न भरणाऱ्यांचे मोबाइल टॉवर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:48+5:302021-02-06T04:28:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महसूल विभागाची थकबाकी न भरणाऱ्या आठ ठिकाणी तहसील कार्यालयातील पथकाने मोबाइल टॉवर सील केले ...

Mobile tower seals for non-payers | थकबाकी न भरणाऱ्यांचे मोबाइल टॉवर सील

थकबाकी न भरणाऱ्यांचे मोबाइल टॉवर सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महसूल विभागाची थकबाकी न भरणाऱ्या आठ ठिकाणी तहसील कार्यालयातील पथकाने मोबाइल टॉवर सील केले आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी राजू बाऱ्हे आणि रमेश वंजारी यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या महसूल वसुलीच्या बैठकीत तहसील कार्यालयाला ९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. त्यानुसार मोबाइल टॉवर थकबाकी आणि अनधिकृत बिनशेती प्रकरणांची महसूल वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात ज्यांनी मोबाइल टॉवरच्या महसुलाची थकबाकी भरलेली नाही त्यांच्यावर शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

यात पांडे चौक, भास्कर मार्केट, ओंकारेश्वर मंदिराजवळ, शाहूनगर, आदर्शनगर, गणेश कॉलनी या भागात ही कारवाई करण्यात आली. तालुक्यात सद्या एकूण २१५ मोबाइल टॉवर आहेत. त्यातील ११६ टॉवरधारकांनी रक्कम दिली आहे. तर उर्वरित ९९ धारकांनी महसुलाची रक्कम दिलेली नाही. शहरातील १५२ पैकी ९३ जणांचे धनादेश तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. तर ग्रामीण भागात ६३ पैकी २३ जणांनी धनादेश दिले आहेत.

अनधिकृत बिनशेतीची प्रकरणे ४३३ आहेत. त्यापैकी ३५५ जणांकडे थकबाकी आहे. तर शर्तभंगच्या प्रकरणांमध्ये १९१ जणांकडे थकबाकी आहे. ही वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Mobile tower seals for non-payers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.