हिवाळी परीक्षांच्या सरावासाठी आजपासून मॉक टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:21 AM2020-12-30T04:21:58+5:302020-12-30T04:21:58+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी परीक्षा ५ जानेवारीपासून ऑनलाइन सुरू ...

Mock test from today for winter exam practice | हिवाळी परीक्षांच्या सरावासाठी आजपासून मॉक टेस्ट

हिवाळी परीक्षांच्या सरावासाठी आजपासून मॉक टेस्ट

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी परीक्षा ५ जानेवारीपासून ऑनलाइन सुरू होणार असून, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बुधवारपासून सॉफ्टवेअरच्या हाताळणी व सरावाकरिता सराव चाचणींना (मॉक टेस्ट) प्रारंभ झाला आहे.

५ जानेवारीपासून ऑनलाइनच्या माध्यमातून हिवाळी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात असणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांसाठी यूझर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आले आहे. २९ डिसेंबरपासून सराव चाचण्यांदेखील सुरुवात झाली आहे. बी.ए., बी.कॉम., बी.बी.ए., बी.एस.डब्ल्यू., सत्र २, ४ व ६चे पुन:परीक्षार्थी यांच्या मॉक टेस्ट सुरू झाल्या आहेत. टप्प्याटप्प्याने इतर वर्गांच्या मॉक टेस्ट घेतल्या जाणार असून, याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली.

Web Title: Mock test from today for winter exam practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.