लोकसहभागातून उभारणार मॉडेल कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:23 PM2020-07-17T22:23:13+5:302020-07-17T22:23:21+5:30
चाळीसगाव येथे झाली बैठक : सर्वपक्षियांसह विविध संघटनांनी घेतली जबाबदारी
चाळीसगाव : कोरोनावर मात करण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटना यांनी पुढे यावे व लोकसहभागातून सर्व सोयीसुविधायुक्त जिल्ह्यातील मॉडेल असे क्वारंटाइन व कोविड सेंटर चाळीसगाव येथे उभारूया असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. महसूल प्रशासनातर्फे चाळीसगाव येथील महात्मा फुले आरोग्य संकुलात आयोजित सर्वपक्षीय व संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते.
आमदार चव्हाण यांनी सांगितले की, क्वारंटाइन व कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून एक अत्याधुनिक रुग्णवाहिका, शववाहिका, ५० बेडसाठी आॅक्सिजन सुविधा लवकरच उपलब्ध होणार आह.े क्वारंटाइन व कोविड सेंटर साठी देखील जे जे शक्य होईल ते पदर खचार्तून मदत करेल असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, डॉ. सी. टी. पवार, आयएमएच्या डॉ. स्मिता मुंदडा, डॉ. दामीनी राठोड, डॉ. मंगेश वाडेकर, डॉ. लीना पाटील, डॉ. गिरीश मुंदडा, डॉ. विनय पाटील, डॉ. अरकडी, डॉ. किरण मगर , डॉ. पंकज निकुंभ, डॉ. शशिकांत राणा, जनरल प्रॅक्टिस असोसिएशनचे डॉ.महेश वाणी, डॉ. सुजित वाघ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र पाटील, महावितरणचे संदीप शेंडगे, माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी पं. स. सदस्य दिनेश बोरसे, नगरसेवक गटनेते संजय पाटील, नगरसेवक श्याम देशमुख, शिवसेना विधानसभा प्रमुख भीमराव खलाणे, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, रोटरीचे प्रकाश बाविस्कर, संमकीत छाजेड, एकनाथ चौधरी डॉ. महेश निकुंभ, डॉ. महेंद्र राठोड प्रदीप देशमुख योगेश भोकरे भास्कराचार्य स्कूलचे प्रा.उमाकांत ठाकूर, राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक विश्वास चव्हाण, उद्योगपती राज पुंशी, नायब तहसीलदार विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले की, लोकसहभागातून ही व्यवस्था उभारावी असा मानस आहे. यासाठी लागणारी आरोग्य उपकरणे, साधनसामुग्री , साहित्य याची त्वरित उपलब्धता व्हावी या दृष्टीने नियोजन करावे.तर इच्छुकाना या कोविड केंद्रात काम करण्याची इच्छा आहे. अशा इच्छुकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यांनी जाहीर केली मदत
महसूल व आरोग्य प्रशासनाने लोकसहभागातून मदतीचे आवाहन केल्यानंतर रोटरी क्लबतर्फे ३ सक्शन मशीन्स, पुन्शी ब्रदर्स तर्फे १० बेड्स, राष्ट्रवादीतर्फे वॉटर फिल्टर, जैन श्रावक संघातर्फे ५ बेड्स, शिवसेना तर्फे ३ बेड्स, महावितरण चाळीसगाव तर्फे ५ बेड्स, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वतीने २ बेड्स अशी मदत जाहीर करण्यात आली. तसेच अनेक दात्यांनी देखील मदत जाहीर केली.