शौचालये ठरलीत रावेरकरांसाठी मॉडेल
By admin | Published: January 14, 2017 12:55 AM2017-01-14T00:55:30+5:302017-01-14T00:55:30+5:30
अनोेखे : शहर हगणदरीमुक्तीसाठी २४ तास वीज, पाणी व संगीताची सोय
रावेर : शहरातील रसलपूर रोड, मंगरूळ दरवाजा व आठवडे बाजार परिसरात बांधण्यात आलेल्या मॉडेल शौचालयापैकी रसलपूर रोडवरील मॉडेल शौचालयास आज शुभारंभ करून महिला-पुरुषांकरिता खुली करून दिल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
रावेरकरांसाठी मॉडेल ठरलेली ही शौचालय २४ तास वीज, पाणी, एफ.एम. रेडिओ संगीत व सफाई कामगारांच्या दिमतीने हगणदरीमुक्तीसाठी आता साहाय्यभूत ठरली असल्याने रामटेक या वैकुंठ धामाच्या मार्गावर हगणदरी करणाºया दोषी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ व ११७ अन्वये थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
शहरातील रसलपूर रोड, मंगरूळ दरवाजा व आठवडे बाजार परिसरात तीन मॉडेल शौचालये उभारण्यात आली आहेत.
महिलांसाठी १० शौचासन व पुरुषांसाठी १० शौचासन असलेल्या या मॉडेल शौचालयाच्या मध्यवर्ती भागात सहकुटुंब सफाई कामगारांचे निवासस्थान आहे.
२४ तास वीज व पाण्याची उपलब्धता तसेच एफएम रेडिओ संगीत व सीसीटीव्ही कॅमेºयाचे असलेले विशेष लक्ष यामुळे महिला व पुरुषांसाठी ही सार्वजनिक मॉडेल शौचालय सुलभ व उपयुक्त ठरली आहेत. रसलपूर रोडवरील मॉडेल शौचालयाच्या किमान ४०० ते १००० महिला-पुरुषांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सामान्य जनतेसाठी एवढी सुविधा उपलब्ध असताना काही बेजबाबदार नागरिकांकडून रामटेक या वैकुंठ धामाच्या मार्गावर मुद्दाम उघड्यावर शौचविधी केला जात असून अंत्ययात्रेचे पावित्र्य बिघडवत आहे.
दरम्यान, आठवडे बाजार व मंगरुळ दरवाजा परिसरात पुढील महिन्यात मॉडेल शौचालये खुली करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(वार्ताहर)
उघड्यावर बसणाºयांविरुद्ध कारवाई होणार...
उघड्यावर शौचास बसणाºयांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कायदा कलम ११५ व अधिनियम १९५१ चे कलम ११५ व ११७ अन्वये पोलीस बंदोबस्तासह गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी पुष्टी जोडली आहे.