हरभरा पिकाचे आधुनिक पद्धतीने उत्पादन

By ram.jadhav | Published: November 1, 2017 12:38 AM2017-11-01T00:38:56+5:302017-11-01T00:42:47+5:30

रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकातील हरभरा हे कडधान्य पीक बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रातीलही शेतकºयांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन आहे़

Modern production of granulated crop | हरभरा पिकाचे आधुनिक पद्धतीने उत्पादन

हरभरा पिकाचे आधुनिक पद्धतीने उत्पादन

Next
ठळक मुद्देसुधारित वाणांची निवड करावीबीजप्रक्रिया गरजेचीचजमिनीची निवड

राम जाधव
आॅनलाईन लोकमत दि़ १ जळगाव : रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकातील हरभरा हे कडधान्य पीक बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रातीलही शेतकºयांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन आहे़ हरभरा डाळीचे मानवी आहारातही अनन्यसाधारण महत्त्व आहे़ या पिकातही आधुनिक पद्धतीचा वापर करून विक्रमी उत्पादन घेता येते़ यावर्षी पाण्याचे प्रमाण कमी असल्याने रब्बी हंगामात शेतकºयांना हरभरा पिकाचे उत्पादन एक चांगला पर्याय आहे़
पेरणीची वेळ महत्त्वाची
कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वीच हरभºयाची लागवड करावी़ तर बागायती हरभरा २० आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन मिळते़ डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी येते़ काबुली हरभºयाची पेरणी सिंचनाची सोय असेल तर करावी, अन्यथा उत्पादनात मोठी घट येते़
चांगल्या उत्पादनासाठी सुधारित वाणांची निवड करावी़ बाजारात विजय, दिग्विजय, जॅकी, विराट, विशाल, पीक़े़ व्ही़-२, ४, कृपा अशी अनेक प्रकारचे सुधारित बियाण्यांचे वाण उपलब्ध आहेत़ ही वाण मर रोगाला प्रतिकारकक्षम असतात, तर खते व पाण्याचा वापर केल्यास उत्पादनात चांगला प्रतिसादही देतात़
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचºयाची जमीन निवडावी़ हलकी अथवा बरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये़ दोन ओळीतील अंतर ३० सें़मी़ व दोन रोपातील १० सें़मी़ अंतरावर टोकन पद्धतीने लागवड करावी़ हेक्टरी ७० ते १०० किलो हरभºयाचे बियाणे पडायला हवे़
पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास २ गॅ्रम थायरम, २ गॅ्रम बाविस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया करावी़ यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रती १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे व तासभर सुकवून मग पेरावे़ यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते़ तसेच मुळावरील नत्रांच्या ग्रंथी वाढून पिकांची वाढ चांगली होते़
खतांची मात्रा
पेरणीवेळी हरभºयाला एकरी ५० किलो डीएपी आणि २० किलो पोटॅश द्यावे़ पीक फुलोºयात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरियाची फवारणी करावी़ वेळोवेळी कोळपणी व खुरपणी करावी़ ज्यामुळे पीक तणविरहीत राहून चांगले उत्पादन मिळेल़ पेरणीच्यावेळी वापशावर फ्ल्युक्लोरॅलिन हे तणनाशक गरजेनुसार वापरता येईल़
हरभरा पिकास पाणी मर्यादेतच दिले जावे़ यातही तुषार सिंचनाचा सुरुवातीपासूनचा केल्यास जमीन कायम वाफसा अवस्थेत राहत असल्याने उत्पादनात चांगली वाढ होते़ तसेच तणही जास्त वाढत नाही व मुळकुज रोगही लागत नाही़ हरभºयावरील घाटेअळी या प्रमुख किडीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या तिसºया आठवड्यापासून निंबोळी अर्क, रासायनिक कीडनाशकांचा वापर करता येईल़ तसेच पक्षी थांबे व कामगंध सापळे लावूनही एकात्मिक पद्धतीने या अळींचे चांगले नियत्रंण करावे़

Web Title: Modern production of granulated crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.