बोदवडमध्ये मोहरमला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 07:25 PM2020-08-26T19:25:34+5:302020-08-26T19:27:25+5:30

हिंदू मुस्लीम बांधवांच्या एकात्मतेची १२० वर्षांची परंपरा असलेल्या मोहरम पर्वाला बुधवारपासून झाली आहे.

Moharram begins in Bodwad | बोदवडमध्ये मोहरमला सुरुवात

बोदवडमध्ये मोहरमला सुरुवात

Next
ठळक मुद्देएकतेचे प्रतीकहिंदूच्या १२०, तर मुस्लीम बांधवांच्या ८० सवाऱ्याचार दिवस चालणाºया उत्सवावर यंदा कोरोनाचे सावटचाकोरीबद्ध पद्धतीत करावा लागणार पर्व




गोपाळ व्यास
बोदवड : हिंदू मुस्लीम बांधवांच्या एकात्मतेची १२० वर्षांची परंपरा असलेल्या मोहरम पर्वाला बुधवारपासून झाली आहे. मोहरम हा मुस्लीम समाज बांधवांचा पहिला महिना आहे. या महिन्याच्या मुस्लीम तारखेनुसार हजरत इमाम हसन हुसैन यांच्या आठवणींचा हा महिना असून, यात बोदवड शहरात त्यानिमित्त सवाºया (छडी) बसवण्याची परंपरा आहे.
चार दिवस चालणाºया या उत्सवात शहरात ठिकठिकाणी घरादारापुढे मांडव टाकतात. सुवासिक काठीला रेशमी कापड परिधान करून त्यावर चांदीचा नाल बसवला जातो. त्यावर चंदन, गुलाब पाणी, अत्तर, अभिर व लोभानच्या सुगंध लावला जातो. नंतर या (छडी) सवाऱ्यांची चौरंगवर बसवून सवाद्य मिरवणूक काढली जाते. यात पहिली मिरवणूक पहिल्या रात्रीला, तर मोहरमच्या ९ तारखेला दुसरी, तसेच मोहरम ताजिया मोहरमच्या १० तारखेला काढली जाते. शेवटच्या मिरवणुकीने समारोप होतो. ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी उसळते.
मोहरमनिमित्त दरवर्षी शहरात आप्तेष्ठ, नातेवाईक मुंबई, सुरत, नांदुरा, मलकापूर, बºहाणपूर येथून न चुकता शहरात दाखल होत असतात. त्यामुळे चार दिवस जणू यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. काहींचे नवस, मनोकामना पूर्ण झाल्यावर या सवाºयांपुढे फेडतात. यासाठी काही अत्तर, चादर, चांदी, खोबरे, गुळ या प्रकारे नवस फेडतात. ही परंपरा गेल्या १२० वर्षांपासून शहरात सुरू आहे.
शहरात बसवल्या जाणाºया या सवाºयांमध्ये सर्वाधिक सवाºया या हिंदूंच्या १२०, तर मुस्लीम बांधवांच्या ८० अशा या २०० सवाºया शहरात बसतात. त्यांची रीतसर नोंदही पोलीस ठाण्याला ठेवण्यात आलेली असते. यंदा मोहरमचे हे पर्व २७ आॅगस्टपासून सुरू होऊन ३० रोजी संपणार आहे. शेवटची मिरवणूक गांधी चौक, गोदडशहा बाबांच्या दर्ग्यात करबला करून समाप्त केली जाते.

काही आहे मानाच्या तर काही उच्च शिक्षितांच्या सवाºया
शहरात बसणाºया या सवाºयांमध्ये काही मानाच्या सवाºया आहेत. त्यांची भगत मंडळी ही उच्च शिक्षित तसेच काही सरकारी नोकरदार आहे, तर काही वकील तर शिक्षकही आहे, मारवाडी समाजबांधवही आहेत.
भास्कर, सलाम, देवीदास, गोपाल गुरुजी, सुभान बाबा मिया, गजू, अमीर, पप्पू, बुना, सूरज, मनोहर कंडक्टर, ताहेर, अमीर, गुड्डू, कय्या, नईम, संतोष भिल, आकाश, राहुल, सागर, लोकेश, अमृत, जगदीश, श्रावण, रणजित, असिफ अशी भगत मंडळी आहे.
यंदा कोरोनाचे सावट असल्याने पारंपरिक हा सण अडचणीत सापडला आहे. मिरवणुकीवर बंदी लावण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत मास्क वापरणे हे बंधनकारक असणार आहे. जमावबंदी आदेश लागू असल्याने त्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे. परिणामी चाकोरीबद्ध पद्धतीत हा सण साजरा करावा लागणार आहे.

Web Title: Moharram begins in Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.