उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मोहिनीराज जोशी यांचा गौरव

By admin | Published: July 17, 2017 12:33 PM2017-07-17T12:33:15+5:302017-07-17T12:33:15+5:30

वाचनालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े रोख एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह व पुष्पपुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आह़े

Mohini Raj Joshi's glorification as an excellent employee | उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मोहिनीराज जोशी यांचा गौरव

उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मोहिनीराज जोशी यांचा गौरव

Next
लाईन लोकमतजळगाव, दि. 17 - व़वा़ वाचनालयाची 140 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वाचनालयाच्या टिळक सभागृहात उत्साहात झाली़ या सभेत मोहिनीराज जोशी यांना वाचनालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े रोख एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह व पुष्पपुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आह़े सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ़ प्रदीप जोशी हे होत़े कार्याध्यक्ष अॅड़प्रताप निकम, उपाध्यक्ष सुशील अत्रे, सहसचिव अॅड़गुरुदत्त व्यवहारे, चिटणीस मिलींद कुळकर्णी, प्रा़मनिष जोशी, अॅड़दत्तात्रय भोकरीकर, संगीता अट्रावलकर, प्रभात चौधरी, विजय पाठक, अभिजित देशपांडे, अनिल शहा, प्रा़शरदचंद्र छापेकर, अशोक जोशी, विलास पाटील, शांताराम सोनार, रमाकांत वैद्य, ग़मा़भट, मधुकर चौधरी, डॉ़ मिलींद बागुल, ज्ञानेश्वर साळवी, डॉ़ अश्विनी टेणी, पुरूषोत्तम कुमावत आदी उपस्थित होत़े सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा़डॉ़शुभदा कुळकर्णी यांनी केल़ेवाचकांचाही झाला सत्कारप्रा़वसंत सोनवणे व कार्यकारी मंडळ सदस्य प्रा़चारुदत्त गोखले यांनीही प्रत्येकी 501 रुपयांचा पुरस्कार देवून जोशी यांचा गौरव केला़ तसेच उत्कृष्ट वाचक रामसिंग पाटील, रमेश महाबळ, सुनीला टेणी, डॉ़ सुरेश पाटील, प्रा़सतीश पवार, प्रा़रमेश लाहोटी आदींचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देवून सत्कार करण्यात आला़ वाचनालयास 5 हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल आजन्म सभासद प्रा़रमेश लाहोटी यांचाही सत्कार करण्यात आला़

Web Title: Mohini Raj Joshi's glorification as an excellent employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.