‘नॅक’ समितीकडून जळगावातील मू.जे. महाविद्यालयात आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:11 PM2018-04-13T12:11:54+5:302018-04-13T12:11:54+5:30
पुन्हा करणार पाहणी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १३ - महाविद्यालय मूल्यांकनासाठी आलेल्या राष्टÑीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेच्या (नॅक) समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मू.जे. महाविद्यालयात कामकाजाचा आढावा घेत येथील विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. शुक्रवारी ही समिती आणखी आढावा घेणार आहे.
मू.जे. महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाच्या दोन फेºया या पूर्वीच झाल्या असून आता तिसºया फेरीसाठी गुरुवारी समिती दाखल झाली. यामध्ये अध्यक्ष तथा पश्चिम बंगाल मधील विद्यासागर विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. आनंद देब मुखोपाध्याय, सदस्य समन्वयक निपाणी, बेळगाव येथील बागेवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. कोथळे, सदस्य गुजरातमधील वल्लभनगर येथील सरदार पटेल विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयप्रकाश त्रिवेदी यांचा समावेश आहे.
या समितीच्या पदाधिकाºयांनी २०१२ ते २०१७ दरम्यानच्या दप्तराची तपासणी केली. यासोबतच विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली आणि महाविद्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाºया उपक्रमांची माहिती घेतली.
या वेळी प्रशासकीय संचालक डॉ. डी.जी. हुंडीवाले, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, महाविद्यालय नॅक समिती अध्यक्ष डॉ. विश्वनाथ झोपे, सचिव डॉ. के.बी. महाजन यांच्यासह तीनही शाखांच्या प्रमुखांनी सहकार्य केले.
नाटिकेद्वारे सेल्फीबाबत जनजागृती
नॅक समितीच्या सन्मानार्थ मू.जे. महाविद्यालयात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये बहारदार नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या सोबतच कोणत्याही प्रसंगी सेल्फी काढण्याबाबत ट्रेण्ड झाला असून त्याचे काय परिणाम होतात व या बाबत काय काळजी घेतली पाहिजे, या संदर्भात नाटिका सादर करण्यात आली.
या वेळी दूरचित्रवाणीवरील नृत्य कलाकार शिवम् वानखेडे यानेदेखील नृत्य सादर केले.