मोकाट कुत्री सर्रास पाणी पित असल्याने रोगराई वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:52+5:302021-04-15T04:15:52+5:30

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना गावातील भटकी कुत्रीही रोगराईने त्रस्त आहेत. या मोकाट कुत्र्यांच्या अंगावरील सर्वच केस ...

Mokat dogs are more likely to get sick as they drink a lot of water | मोकाट कुत्री सर्रास पाणी पित असल्याने रोगराई वाढण्याची शक्यता

मोकाट कुत्री सर्रास पाणी पित असल्याने रोगराई वाढण्याची शक्यता

Next

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना गावातील भटकी कुत्रीही रोगराईने त्रस्त आहेत. या मोकाट कुत्र्यांच्या अंगावरील सर्वच केस उडाले असून त्यांना खरुजसारख्या आजाराने ग्रासले आहे. सध्या हे चित्र सर्वत्र पहावयास मिळत असताना मात्र शिरसोली येथे हे कुत्रे पिण्याच्या पाइपच्या लीक झालेल्या व्हाॅल्व्हमध्येच पाणी पित असल्याने रोगराई वाढण्याची शक्यता बळावली आहे.

शिरसोली प्र बो येथील पाण्याच्या टाकीजवळील नवीन रहिवाशी वस्तीतील दोन पाणीपुरवठा करणारे व्हाॅल्व्ह बऱ्याच दिवसांपासून लीक आहेत. या लीक व्हाॅल्व्हमुळे लीक व्हाॅल्व्हच्या आजूबाजूला मोठे पाण्याचे डबके साचले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. एवढेच कमी की काय याच व्हाॅल्व्हमधून मोकाट कुत्री सर्रास पाणी पीत आहेत. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाण्यामुळे येथील जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, येथील लीक झालेले पाणीपुरवठ्याचे व्हाल त्वरित दुरुस्त करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून केली जात आहे.

------------------

Web Title: Mokat dogs are more likely to get sick as they drink a lot of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.