रेल्वेत महिलेचा विनयभंग करणा:या बांग्लादेशी संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 04:08 PM2017-07-07T16:08:06+5:302017-07-07T16:08:06+5:30

दुरंतो एक्स्प्रेसमधील घटना

Moliere of the woman in Railwat: The suspected Bangladeshi suspect arrested | रेल्वेत महिलेचा विनयभंग करणा:या बांग्लादेशी संशयितास अटक

रेल्वेत महिलेचा विनयभंग करणा:या बांग्लादेशी संशयितास अटक

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.7 - हावडा -मुंबई दुरंतो एक्स्प्रेसने प्रवास करणा:या 30 वर्षीय नोकरदार विवाहित महिलेचा विनयभंग करणा:या बांग्लादेशी मोहमद अयुब मोहमद सुलेमान (वय 23) यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. विनयभंगाची दुरंतो एक्स्प्रेसच्या बी-6 बर्थ क्रमांक 22 वर  घडली.
बंगलोर येथील विवाहिता हावडा-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसने नागपूर-मुंबई असा प्रवास करीत होती. ही महिला प्रवासी रात्री झोपली असताना संशयित मोहमद अयुब मोहमद सुलेमान ( रा. रतनपूर वॉर्ड, 3-गीरोली बाजार, फेनी सदर, जि.फेनी, बांग्लादेश याने या महिलेचा विनयभंग केला.
या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी भादंवि कलम 354 सह विदेशी नागरीक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली.

Web Title: Moliere of the woman in Railwat: The suspected Bangladeshi suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.