विद्यापीठात महिलांसाठी सोमवारी आरोग्य विषयक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:17+5:302021-07-17T04:14:17+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभाग व योग मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभाग व योग मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. १९ जुलै) विद्यापीठाच्या अधिसभागृहात महिलांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ जुलैला दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या अधिसभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार राहतील. कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांची उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठात विविध कामांसाठी कंत्राटी, दैनिक वेतनिक महिला वर्ग कार्यरत असून, त्यामध्ये उद्यान विभाग, साफसफाई, कुशल, अकुशल, सुरक्षा रक्षक व परीक्षा विभागात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या महिलांसाठी महिलांचे आरोग्य, ताणतणाव व योग, त्यांची शारीरिक क्षमता, पारिवारीक समस्या, शिक्षण व त्यांची मानसिकता अशा विविध विषयांवर योग मार्गदर्शन केंद्राच्या सहा. प्राध्यापक डॉ. लिना चौधरी व वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सांगळे ह्या मार्गदर्शन करणार असून, महिलांशी थेट चर्चा करणार आहेत.