सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:46+5:302021-07-24T04:12:46+5:30
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरिता ११ ऑगस्ट रोजी निवड चाचणी जळगाव : केंद्र शासन संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव (भुसावळ) ...
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरिता ११ ऑगस्ट रोजी निवड चाचणी
जळगाव : केंद्र शासन संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव (भुसावळ) येथील इयत्ता सहावीच्या सन २०२१-२२ प्रवेशाकरिता होणारी निवड चाचणी बुधवार, ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. अधिक माहितीकरिता संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी केले आहे.
वेबिनारमध्ये सहभागाचे आवाहन
जळगाव : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. यात उद्योजक व नव्याने लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील मेळावा
जळगाव : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत २४ रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर येथे पोलीस पाटील मेळावा होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता बोदवड येथे नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच संध्याकाळी ५.१५ वाजता मुक्ताईनगर येथे हजेरी लावणार आहे.
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
जळगाव : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, नायब तहसीलदार अमित भोईटे, अव्वल कारकून आर. एस. पाटील आदी उपस्थित होते.