प}ीच्या उपचाराचे पैसे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 01:07 AM2017-04-18T01:07:15+5:302017-04-18T01:07:15+5:30

मोहन नगरात बंद घर फोडले : 72 हजारांचा ऐवज लंपास; बाहेर गावी गेलेल्या कुटुंबावर ओढविले संकट

Money laundering money has been delayed | प}ीच्या उपचाराचे पैसे लांबविले

प}ीच्या उपचाराचे पैसे लांबविले

Next

जळगाव : शहरात घरफोडी व चोरीचे सत्र सुरुच आहे. रविवारी कासमवाडीत रिक्षा चालकाकडे घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच मोहन नगरात चंद्रकांत हिंमतराव वाघ (वय 45) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी 42 हजार रुपये रोख, 30 हजार रुपयांचे दागिने व मेमरी कार्ड असा 72 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. रोख रक्कम ही प}ीच्या औषधोपचारासाठी ठेवण्यात आली होती. त्यावर चोरटय़ांनी डल्ला मारला.
एका खासगी कंपनीत  नोकरीला असलेले चंद्रकांत वाघ हे मोहन नगरात वृंदावन गार्डन जवळ प्लॉट क्रमांक 88 मध्ये प}ी उर्मिला व मुलगा भारत (वय 12) यांच्यासह वास्तव्याला आहेत.
सिन्नर येथे नातेवाईकाकडे रविवारी साखरपुडा असल्याने त्यांच्या प}ी दोन दिवस आधीच शिरपूर येथून वाहने निघणार असल्याने त्या तेथे गेल्या होत्या. तर चंद्रकांत वाघ हे रविवारी सकाळी महानगरी एक्सप्रेसने सिन्नरला गेले होते.
पुण्याला जाण्याच्या तयारीत असताना आला चोरीचा फोन
साखरपुडा आटोपून वाघ हे पुणे येथे जाण्याच्या तयारीत असताना सोमवारी सकाळीच साडू अॅड.संजयकुमार वाघ यांनी घरात चोरी झाल्याचे भ्रमणध्वनीद्वारे कळविले. धुनी-भांडी करण्यासाठी                     येणा:या महिलेला कंपाऊडला कुलूप लावलेले तर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा दिसला. त्यांनी शेजारील कुळकर्णी या महिलेला याची माहिती दिली. त्या महिलेने अॅड.वाघ व शालक उमेश कापडे यांना घटनेची माहिती दिली होती.घरात चोरी झाल्याचे समजताच वाघ यांनी पुण्याचा दौरा रद्द करुन तातडीने जळगाव गाठले. घराची पाहणी केल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, चोरटय़ांनी वाघ यांनी आणलेले नवीन कुलुपही चोरुन नेले आहेत. मुलाच्या दप्तरातील किरकोळ साहित्य देखील गायब झाले आहे. कपाटात वगळता अन्य कोणत्याही भांडय़ाला किंवा दुस:या खोलीतील वस्तुला चोरटय़ांनी हात लावला  नाही.

Web Title: Money laundering money has been delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.