गावठी पिस्तुल तयार करणाºयाला दोन पिस्तुलसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:09 PM2019-11-23T23:09:06+5:302019-11-23T23:12:20+5:30

स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल तयार करणाºया गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (२५, रा.उमर्टी, ता.सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळोद, ता. अमळनेर गावापासून एक कि.मी.अंतरावर असलेल्या पुलाखाली त्याने लपविले दोन गावठी पिस्तुल जप्त करण्यात आहे.

With the money in the pants pocket extended the neck mangalsutra | गावठी पिस्तुल तयार करणाºयाला दोन पिस्तुलसह अटक

गावठी पिस्तुल तयार करणाºयाला दोन पिस्तुलसह अटक

Next
ठळक मुद्दे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईपुलाखाली लपविले होते पिस्तुल

जळगाव- स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल तयार करणाºया गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (२५, रा.उमर्टी, ता.सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळोद, ता. अमळनेर गावापासून एक कि.मी.अंतरावर असलेल्या पुलाखाली त्याने लपविले दोन गावठी पिस्तुल जप्त करण्यात आहे.
भुसावळसह जिल्ह्यात झालेल्या बहुतांश घटनांमध्ये गावठी पिस्तुलचाच वापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पिस्तुल रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला व त्याअनुंषगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना सूचना केल्या. रोहोम यांनी यासाठी हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, महेश पाटील, दीपक पाटील यांच्यासह विजय पाटील व नरेंद्र पाटील यांचे पथक नेमून गावठी पिस्तुलची निर्मिती व विक्री याचे रॅकेट शोधायला सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या तपासात भुसावळात वापरण्यात आलेले पिस्तुल उमर्टी येथून आणल्याचे निष्पन्न झाले.
उमर्टीतूनच उचलले पिस्तुल बनविणा-याला
या पथकाने शुक्रवारी उमर्टी येथे जावून गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला यालाच ताब्यात घेतले. त्याने आपण पिस्तुल तयार करुन ते २० हजार रुपयात विक्री करीत असल्याचे सांगितले. अमळनेर तालुक्यातून दोन पिस्तुलची आॅर्डर होती, त्यामुळे हे पिस्तुल घेऊन जात असताना पोलीस तपासणी सुरु असल्यामुळे जळोद गावाजवळ एका पुलाखाली हे पिस्तुल लपविल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी बर्नाला याला घेऊन थेट जळोदजवळील पुल गाठला. तेथे त्याने लपविले दोन्ही पिस्तुल काढून दिले. दरम्यान, याप्रकरणी शनिवारी मारवड, ता.अमळनेर पोलीस स्टेशनला बर्नाला याच्याविरुध्द आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: With the money in the pants pocket extended the neck mangalsutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.