महिनाभरापूर्वीच लागलेल्या वायरमनचा खांबावरच मृत्यू
By admin | Published: February 4, 2016 01:08 AM2016-02-04T01:08:49+5:302016-02-04T01:08:49+5:30
चाळीसगाव : विजेच्या खांबावर काम करताना वीज प्रवाह अचानक सुरु झाल्याने सागर विजय सूर्यवंशी (वय 25, रा.नेरी ता.पाचोरा) या कंत्राटी वायरमनचा भाजल्यामुळे खांबावरच मृत्यू झाला.
चाळीसगाव : विजेच्या खांबावर काम करताना वीज प्रवाह अचानक सुरु झाल्याने सागर विजय सूर्यवंशी (वय 25, रा.नेरी ता.पाचोरा) या कंत्राटी वायरमनचा भाजल्यामुळे खांबावरच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना हिंगोणे खुर्द (ता. चाळीसगाव) येथे 3 रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान घडली. महिनाभरापूर्वीच तो रुजू झाला होता. सागर हा वाघळी सबस्टेशनमध्ये कार्यरत होता. वाघळी सबस्टेशन अंतर्गत हिंगोणे शिवारातील तितूर नदीकाठी हनुमान मंदिराजवळ असलेल्या विजेच्या खांबावर तो काम करण्यासाठी चढला. त्यावेळी वाघळी सबस्टेशनमधील वायरमन, ज्युनि. इंजिनिअर, कार्यकारी अभियंता हे देखील त्याच्यासोबत होते. दुरुस्तीचे काम सुरु असतानाच त्याला विजेचा जबर धक्का बसला. यात तो गंभीररित्या भाजला व त्याचा मृत्यू झाला. वायरमनसह ज्युनि.इंजिनिअर, कार्यकारी अभियंता अशा तीन जणांविरुध्द चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सागरच्या मृत्यू झाल्यास समजताच नेरी - वडगाव (पाचोरा) येथील काही युवकांनी वाघळी उपकेंद्रात तोडफोड केली.