एप्रिलच्या तुलनेत मे महिन्याची दिलासादायक सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:21+5:302021-05-11T04:16:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एप्रिलमध्ये जिल्हाभरात कहर झालेल्या कोरोना संसर्गाचा आलेख मे महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसात खाली उतरत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एप्रिलमध्ये जिल्हाभरात कहर झालेल्या कोरोना संसर्गाचा आलेख मे महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसात खाली उतरत असल्याची दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या दहा दिवशांशी मे च्या पहिल्या दहा दिवसांशी तुलना केली असता, नव्या रुग्णांच्या बाबतीत मे महिन्यात रुग्णसंख्या २६५५ ने कमी नोंदविण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. यामुळे बेडची उपलब्धताही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे नागरिकांची वणवण थांबली आहे. ऑक्सिजनवरील रुग्ण घटताहेत, ऑक्सिजनची नियमित लागणारी मागणी ५० टक्क्यावर आली आहे. मध्यंतरी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले होते. त्यात लवकर रुग्ण समोर आल्याने ते विलग झाल्याने पुढील संसर्ग टाळता आला आहे. शिवाय शहरात तर वेगवेगळ्या भागात रस्त्यावर तपासणी केली असता त्यातही अनेक जण बाधित आढळून आले आहेत. गृहविलगीकरणाचे निकष कडक करण्यात आल्याने या रुग्णांवरही यंत्रणेचा वॉच राहिल्याने त्यांच्यापासून वाढणारा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. दरम्यान, विषाणूची तीव्रता कमी होत असल्याची ही शक्यता असल्याचे मतही काही डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. कारण शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या अनेक भागात आता रुग्ण समोर येत नाहीत, शिवाय जिल्ह्यातही काही भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मृत्यूच्या संख्येत एप्रिलच्या तुलनेत मे च्या सुरुवातीला ३४ मृत्यू अधिक झाले आहेत. मात्र, एप्रिलच्या मध्यंतरी मृत्यू वाढले त्यापेक्षा ही संख्या कमी आहे.
चाचण्या मात्र कमी
एप्रिल महिन्यातील ९ दिवसातील चाचण्या ८० हजार ४३८
मे महिन्याच्या ९ दिवसातील चाचण्या ६६ हजार ६८
मे महिन्यात १४ हजार चाचण्या कमी झाल्या आहेत.
पॉझिटिव्हिटी
एप्रिलच्या सुरुवातीला : १३. १० टक्के
मे च्या सुरुवातीला : ११.९३ टक्के
मे च्या सुरुवातीला बाधितांचे प्रमाण दोन टक्क्यांनी घटले आहे.
एप्रिलची सुरुवात
१ एप्रिल ११६७, मृत्यू १३
२ एप्रिल ११४२, मृत्यू १५
३ एप्रिल ११९४, मृत्यू १५
४ एप्रिल ११७९, मृत्यू १४
५ एप्रिल ११८२, मृत्यू १५
६ एप्रिल ११७६, मृत्यू १६
७ एप्रिल ११४१, मृत्यू १४
८ एप्रिल ११९०, मृत्यू १५
९ एप्रिल ११६७, मृत्यू १७
एकूण १०५३८, मृत्यू ११९
मे महिन्याची सुरूवात
१ मे ९३६, मृत्यू १६
२ मे ९०४, मृत्यू १६
३ मे ८०२, मृत्यू १९
४ मे ८०८, मृत्यू १९
५ मे ९९९ मृत्यू १८
६ मे ८५८, मृत्यू १६
७ मे ८६१, मृत्यू १६
८ मे ८७७, मृत्यू १६
९ मे ८३८, मृत्यू १७
एकूण ७८८३, मृत्यू १५३