मोराड येथील कर्जबाजारी शेतकºयाची आत्महत्या, शेतातच घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:12 PM2018-02-24T12:12:44+5:302018-02-24T12:12:44+5:30
बँक, पतसंस्था, खाजगी सावकारी कर्जाने होते चिंताग्रस्त
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - जामनेर तालुक्यातील मोराड येथील समाधान सकरू राठोड (४०) या कर्जबाजारी शेतकºयाने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
मोराड येथे समाधान व त्यांच्या भावाची मिळून एकूण अडीच एकर शेती आहे. ही जमीन दोन्ही भाऊ मिळून कसतात. शेतीसाठी त्यांनी बँक, पतसंस्था तसेच सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज जवळपास अडीच ते तीन लाखावर पोहचले. त्यात शेतात उत्पन्न न आल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच समाधान राठोड होते. त्यात शुक्रवारी शेतात कोणीही नसताना राठोड यांनी विष प्राशन केले.
त्या वेळी रस्त्याने जाणाºया एका मुलीस राठोड दिसले व तिने येणाºया जाणाºया नागरिकांना याची माहिती दिली. त्या वेळी तत्काळ नागरिकांनी समाधान यांना शेंदुर्णी येथे रुग्णालयात हलविले. तेथून डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वर्षभरापूर्वीच शेतीची विक्री करुन मुलीचे लग्न
घरची परिस्थिती नाजूक असल्याने समाधान यांनी वर्षभरापूर्वीच थोडीफार शेती विक्री करुन मुलीचे लग्न केले. जी शेती शिल्लक होती त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असायची. मात्र कर्जाचा बोझा वाढत असताना अल्प पावसामुळे शेतीतील उत्पन्न घटत गेले व राठोड अधिकच चिंताग्रस्त झाले, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.