छोट्या-मोठ्या उपक्रमातून वाढते पोलिसांचे मनोधैर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 04:45 PM2020-10-12T16:45:38+5:302020-10-12T16:51:20+5:30
जामनेर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचे वाढदिवस, गुणगौरव, पाल्यांचा सत्कार असे छोटे-मोठे उपक्रम आयोजित केले जात आहेत.
जामनेर : जामनेर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचे वाढदिवस, गुणगौरव, पाल्यांचा सत्कार असे छोटे-मोठे उपक्रम आयोजित केले जात आहेत. सध्याचा काळ हा कोरोनाचा असल्यामुळे पोलीस कर्मचाºयांना ताण तणावातून मुक्त करण्यासाठी असे छोटे उपक्रम पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे राबवत असतात.
नेहमीच पोलीस स्टेशनला तक्रातदार यांची वर्दळ, आपापसातील भांडण तसेच गुन्हेगारांशी संपर्क येत असल्याने नेहमीच शिवराळ भाषा ऐकायला मिळणाºया जामनेर पोलीस ठाण्यात टाळ्यांचा कल्लोळ व गोड हास्याच्या आवाजातून ‘हॅप्पी बर्थडे टू यू’चा सूर ऐकायला मिळाला.
पोलीस हवालदार विलास चव्हाण यांचा शनिवारी वाढदिवस होता. पोलीस ठाण्यातर्फे वाढदिवसाचे छोटेखानी आयोजन केले होते. पोलीस ठाण्याचे जवळपास सर्वच कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्व कर्मचारी, अधिकारी हास्यविनोदात रमले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग पाळून या उपक्रमातूून अधिकारी व कर्मचाºयांमध्ये जवळकीता निर्माण होऊन परस्परांप्रती विश्वासाचे नाते तयार झाले.
सध्याच्या काळात आता कोरोना महामारी सुरू असून तसेच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पोलीस हा नेहमीच तणावात असतो साहजिकच त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजासह त्या कुटुंबावरही होतो त्यामुळे या सर्व बाबींवर तणावातून मुक्त हा एक चांगला पर्याय असल्याने कर्मचाºयांसाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांना तणावमुक्त करण्याचा माझा प्रयत्न असतो.
-प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर