वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 08:42 PM2020-10-05T20:42:22+5:302020-10-05T20:43:36+5:30
वीज बील कमी करण्यात यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.
रावसाहेब भोसले
पारोळा : कोरोनाच्या काळात महावितरण कंपनीने वीजधारकांना भरमसाठ वीज बील आकारल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले. वीज बील कमी करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला.
सकाळी १०.३० वाजता बालाजी मंदिरापासूृन या मोर्चाला सुरुवात झाली. नगरसेवक पी.जी.पाटील यांनी नेतृत्व केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
एवढी बिले भरावी कशी असा संताप्त सवाल अनेकांना केला. या मोर्चात वीज बील माफ करा, या वितरण कंपनीचे करायचे काय यासह घोषणा देण्यात आल्या.
मोर्चा बालाजी मंदिर, रथ चौक, गावहोळी चौक, पालिका चौकातून बाजार पेठ मार्गे शिवाजी महाराजाच्या पुताळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येवून पारोळा महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी पी.एस.पाटील, शहर सहाय्यक अभियंता एच.एस.वळवी, कनिष्ठ अभियंता ए.जे. धर्माधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी छावा संघटनेचे विजय पाटील, प्रताप पाटील, विजय पाटील, रवींद्र कोठावदे, दिनेश लोहार, विजय जगताप, श्रावण शिंपी, बबलू राजपूत, प्रकाश पेंटर, राजू मिस्तरी, दिनकर शिंदे, भैया मिस्तरी, अनिल लोहार, पांडू पाटील, प्रसाद महाजन, गोपाल महाजन, सुशील शिरोळकर, ईश्वर पाटील, राजू शिंदे आदी सहभागी झाले होते. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, सुनील पवार यांच्यासह एरंडोल व पारोळा पोलिसांचा बंदोबस्त चोख होता.