तहसील कार्यालयावर आज मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:09+5:302021-07-19T04:13:09+5:30
आज महिला लोकशाही दिन जळगाव : महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व पीडित महिलांना ...
आज महिला लोकशाही दिन
जळगाव : महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी होणारा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन होणार आहे. ज्या महिलांना आपली तक्रार मांडावयाची असेल, त्यांनी तक्रार अर्ज तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मेलवर पाठवावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
जळगाव : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) अभिवादन करण्यात आले. नेरीनाका चौकातील अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पुष्पहार अर्पण केला. रमाबाई ढिवरे, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, प्रतिभा भालेराव, सचिन अडकमोल, प्रताप बनसोडे, बबलू शिंदे, नरेंद्र मोरे, हरी शिंदे, बापू धामणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
योजनांसाठी मागविले प्रस्ताव
जळगाव : पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेकरिता १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेंतर्गत उद्योग, व्यवसायांसाठी मदत केली जाणार असून योजनेसाठी इच्छुकांनी ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे यांनी केले आहे.
योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत
जळगाव : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पिकांना विमा संरक्षण मिळणार असून या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
सूचना ... सर , वरील बातमीत मुदत......सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत आहे........आज १८ जुलै आहे...