नंदुरबार जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक केंद्र कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:53 PM2017-08-06T12:53:49+5:302017-08-06T12:55:13+5:30
कजर्माफीचे अर्ज : हजाराच्या आतच दाखल झाले ऑनलाईन अजर्
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 6- कजर्माफी संदर्भात शेतक:यांना ऑनलाईन अर्ज अर्थात शपथपत्र भरून द्यायचे आहे. त्यासाठी 31 ऑगस्टर्पयत मुदत आहे. परंतु योग्य प्रसिद्धी, जनजागृती याचा अभाव असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास फारसा प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात 39 महाईसेवा केंद्र, 60 पेक्षा अधीक ग्रामपंचायतीच्या आपले सरकार उपक्रमाअंतर्गत हे अर्ज भरले जात आहेत.
शासनाने शेतक:यांची कजर्माफी जाहीर केली आहे. त्याअंतर्गत निकषात बसणा:या जिल्ह्यातील 35 हजारापेक्षा अधीक शेतक:यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मात्र संबधित शेतक:यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी महाईसेवा केंद्राच्या 42 पैकी 39 केंद्रांवर तर आपले सरकार अंतर्गत ग्रामपंचायतींच्या 60 पेक्षा अधीक केंद्रावर ही सोय करण्यात आली आहे. महाईसेवा केंद्र वगळता आपले सरकारच्या केंद्रांवर विशेष दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटीचा मोठा अडसर येत आहे.
जनजागृतीवर भर
सध्या पीक विम्यासाठी प्रशासन आणि कृषी विभाग सरसावला आहे. आधी 31 जुलै मुदत होती. नंतर ती 5 ऑगस्ट करण्यात आली. त्यामुळे बिगर कजर्दार शेतक:यांना या योजनेत जास्तीत जास्त सामावून घेण्यासाठी आणि आपले दिलेले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कृषी विभाग मेहनत घेत आहे. तरीही केवळ सात हजार बिगर कजर्दार शेतक:यांनीच पीक विमा काढल्याचे आकडेवारीनुसार समोर येत आहे. पीक विम्याची 5 ऑगस्टची मुदत संपल्यानंतर कर्ज माफीच्या अर्जासाठी विशेष मोहिम आखली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
कर्ज माफीचा लाभ जास्तीत जास्त शेतक:यांना मिळावा यासाठी कृषी विभाग जनजागृती करणार आहे. त्यासाठी विशेष मोहिम देखील आखली जाणार आहे. तशा सुचना देखील जिल्हाधिका:यांनी दिलेल्या आहेत. पात्र शेतक:यांपैकी एकही शेतकरी यापासून वंचीत राहू नये असा उद्देश त्यामागे आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. गावोगावी मेळावे घेणे, स्थानिक कृषी कर्मचा:यांकडून माहिती देणे, प्रसंगी गावात दवंडी देणे आदी उपक्रमांचा त्यात समावेश राहणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
कजर्माफीचे अर्ज भरतांना कजर्दार शेतकरी व त्याची प}ी या दोघांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दोघांचे बायोमेट्रीक अंगठे घेतले जाणार आहेत. त्यानंतरच तो अर्ज स्विकारला जाणार आहे. ऑनलाईनप्रमाणे ऑफलाईनचीही सुविधा असली तरी त्यासाठी मात्र पुढे आणखी प्रक्रिया राहणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरणेच सोयीस्कर ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील दुर्गम भागात अडचणी येण्याची शक्यता आहे. दुर्गम भागात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे अडचणी येतात. याशिवाय वीज नसणे, पावसामुळे शेतक:यांना संबधीत ठिकाणी जाण्यास अडचणी येणे, शेती कामांचे दिवस असतांना ते सोडून अर्ज दाखल करण्यासाठी पती-प}ी सोबत जाणे असे एक ना अनेक अडचणी सध्या शेतक:यांसमोर आहेत. त्यामुळे सध्यातरी फारसा प्रतिसाद नसल्याचेच चित्र आहे.