आव्हाणे येथे 500 पेक्षा अधिक मतदारांचा बहिष्कार

By admin | Published: February 17, 2017 01:11 AM2017-02-17T01:11:12+5:302017-02-17T01:11:12+5:30

मतदार यादीमध्ये अनुक्रम नंबर अनेक याद्यांमध्ये शोधूनही न सापडल्याने 500 पेक्षा अधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

More than 500 voting boycott voters | आव्हाणे येथे 500 पेक्षा अधिक मतदारांचा बहिष्कार

आव्हाणे येथे 500 पेक्षा अधिक मतदारांचा बहिष्कार

Next

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव येथे मतदार यादीमध्ये अनुक्रम नंबर अनेक याद्यांमध्ये शोधूनही न सापडल्याने जवळपास 500 पेक्षा अधिक मतदारांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करून मतदानावर बहिष्कार टाकला. याप्रकारामुळे आव्हाणे गावात तणाव निर्माण झाला होता. तर आसोदा ता.जळगाव येथे मतदान यंत्रात मतदान करताना कुठल्याही उमेदवारासमोरील बटन दाबले तरी फक्त शिवसेनेलाच मतदान होत होते, अशी तक्रार जि.प.गटाच्या उमेदवार रुपाली भोळे यांनी केली. पण या तक्रारीमध्ये कुठलेही तथ्य चौकशीअंती आढळले नसल्याचा निर्वाळा तहसीलदार यांनी केला आहे. उजाड कुसुंबा येथे शिरसोली चिंचोली गटातील जि.प. उमेदावारांच्या दोन गटांमध्ये वाद झाला.

हे आहे याद्यांमधील घोळाचे कारण
तहसील प्रशासनाने मतदानाबाबत गट व गणनिहाय याद्यांनुसार नियोजन केले. याच नियोजनानुसार गट व गणनिहाय याद्या उमेदवारांना देण्यात आल्या. पण नंतर म्हणजेच मागील सोमवारी मतदान केंद्रनिहाय याद्या निवडणूक आयोगाने पाठविल्या. या याद्यांनुसार मतदानाची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना आल्या.

परंतु सोमवारपर्यंत सर्वच उमेदवारांनी गट व गणनिहाय मतदार याद्यांनुसार आपल्या मतदार स्लीप तयार केल्या व त्यांचे वितरणही केले. या स्लीपमधील मतदाराचा अनुक्रम नंबर व जुन्या गट व गणनिहाय यादीमधील अनुक्रम नंबर यात तफावत आढळली. त्यामुळे नव्या यादीमध्ये अनेक मतदारांचे अनुक्रम नंबर आढळले नाहीत. यादीत नाव होते, पण अनुक्रम नंबरचा घोळ झाल्याने शोधाशोध करावी लागली.


यादी शोधण्यातच तास, दोन तास गेल्याने अनेक मतदारांना मन:स्ताप सहन करावा लागला. अशातच आव्हाणे ता.जळगाव येथे जवळपास 500 मतदारांनी मतदान न करताच केंद्र सोडले. यातच मतदान केंद्रात काही वेळ तणाव निर्माण झाला. लागलीच तहसीलदार यांना बोलावण्यात आले.


तहसीलदार अमोल निकम यांनी केंद्राला भेट दिली व यादीमध्ये कसा बदल झाला.., अनुक्रम नंबर मतदान केंद्रनिहाय यादीनुसार घेऊन ही प्रक्रिया राबविली जात असल्याचे स्पष्ट केले. नंतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलिसांचा अतिरिक्त ताफाही पाठविण्यात आला.


आसोदा येथे मतदान यंत्राबाबत तक्रार
आसोदा ता.जळगाव येथे मतदान केंद्र क्रमांक 28 मधील यंत्रात कुठलेही बटन दाबले तरी फक्त शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान होत असल्याची तक्रार भाजपाच्या उमेदवार रुपाली भोळे यांनी केली. तहसीलदार यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर तहसीलदार यांनी मतदान यंत्राची तपासणी केली. मतदान केलेल्या 10 व्यक्तींकडून माहिती घेतली.. मतदान केंद्राध्यक्षांना विचारणा केली. त्यात या मतदानकेंद्रात कुठलाही घोळ आढळलानाही, असे तहसीलदार निकम यांनी सांगितले.

तालुक्यातील 181 मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान झाले. मतदान केंद्रानिहाय नवीन यादी आल्याबाबत उमेदवारांना सूचना दिल्या. कुठेही मोठे वाद झाले नाहीत. मतदान यंत्रात बिघाडही झाले नाही.       -जलज शर्मा,      
  निवडणूक निर्णय अधिकारी
 

Web Title: More than 500 voting boycott voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.