सातबारा संगणकीकरणाचे ९९ टक्केपेक्षा जास्त काम पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:17 AM2021-04-01T04:17:10+5:302021-04-01T04:17:10+5:30
जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाचे सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू होते. हे काम आता मार्च अखेरीस ...
जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाचे सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू होते. हे काम आता मार्च अखेरीस पूर्णत्वाच्या टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १२ लाख ५ हजार सातबारा उतारे आहेत. त्यातील फक्त दोन ते अडीच हजार उतारे हे डिजिटल साईन होण्यात अडचणी येत आहेत.
डिजिटल सातबारा काढल्यावर त्यासाठी नागरिकांना तलाठीकडुन सही शिक्का घेण्याची गरज पडत नाही. त्याची फी ही फक्त १५ रुपये आहे. हे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यात दोन ते अडीच हजार सातबारा उतारे हे डिजिटल साईन होऊ शकत नाही. सध्या जळगाव जिल्ह्यात हे सातबारा उतारे निघण्यात कोणतीही अडचण येत नाही. मात्र जे अडीच हजार सातबारा उतारे डिजिटल साईन होण्याचे बाकी आहेत त्यांनाच फक्त तलाठी यांच्याकडून सही आणि शिक्का घ्यावा लागत असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी दिली.