जीएमसीत आणखी कॅमरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:15+5:302021-04-18T04:15:15+5:30
बांधकाम पूर्णत्वाकडे जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाहने पार्किंग परिसराच्या बाजुला शौचालय बांधण्यात येत असून या शौचालयाचे काम पूर्णत्वाकडे ...
बांधकाम पूर्णत्वाकडे
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाहने पार्किंग परिसराच्या बाजुला शौचालय बांधण्यात येत असून या शौचालयाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. लवकरच हे शौचालय रुग्णांच्या नातेवाइकांसाठी वापरात येणार आहे. परिसरात असे स्वच्छतागृह नसल्याने नातेवाइकांची अडचण होत होती.
भोेंग्यातून सूचना
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी टाळण्यासाठी व मास्क संदर्भातील जनजागृती व सूचना देण्यासाठी भोंग्याचा वापर करण्यात येत आहे. रुग्णालय आवारात गर्दी झाल्यानंतर तातडीने वॉर रूमचे कर्मचारी माईकद्वारे भोंग्यावर सूचना देऊन गर्दी कमी करत असतात.
दुचाकींची गर्दी
जळगाव : पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असतानाही आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन कक्षासमोर मुख्य इमारतीसमोर रुग्णाच्या नातेवाइकांच्या दुचाकी लागत असून यामुळे गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाहनांची गर्दी वाढली आहे. यामुळे रुग्णवाहिकांना बऱ्याच वेळा अडचणीचा सामना करावा लागत असतो.
जि.प.त गर्दीवर नियंत्रण
जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना शिवाय दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपस्थितीवर ५० टक्के बंधने असून अभ्यागतांना बंदी करण्यात आली आहे. अनेक विभागांमध्ये शुकशुकाट राहत असल्याचे चित्र आहे.