वाळू उचलची मुदत संपत आली तरी निम्म्याहून अधिक गटांना प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:16+5:302021-05-30T04:14:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर आता वाळू उचलची मुदत ९ जूनला ...

More than half of the groups did not respond, even though the sand extraction deadline had passed | वाळू उचलची मुदत संपत आली तरी निम्म्याहून अधिक गटांना प्रतिसाद नाही

वाळू उचलची मुदत संपत आली तरी निम्म्याहून अधिक गटांना प्रतिसाद नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर आता वाळू उचलची मुदत ९ जूनला संपणार असली तरी १३ वाळू गटांना प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे या वाळूगटांसाठी वारंवार फेरनिविदा काढण्यासह त्यांची हातची किंमत २५ टक्क्यांनी कमी करण्यात आली होती, तरीदेखील त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, लिलाव झालेल्या आठ वाळू गटांतून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळालेला आहे.

पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारीला निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला.

मात्र, जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यांतील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर २५ टक्के हातची किंमत कमी करून फेरनिविदा काढण्यात आली. मात्र, तरीदेखील या वाळू गटांना प्रतिसाद मिळाला नाही.

मुदत संपण्यास १० दिवस शिल्लक

२० जानेवारीला जिल्ह्यातील वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर केवळ बांभोरी, घाडवेल (ता. चोपडा), आव्हाणी (ता. धरणगाव), नारणे, वैजनाथ, टाकरखेडा, उत्राण १, उत्राण २ या आठ वाळू गटांचे लिलाव झाले. त्यानंतर आता वाळू उचलची मुदत ९ जूनला संपणार असून, यास आता केवळ दहा दिवस शिल्लक असले तरी उर्वरित वाळू गटांना प्रतिसाद मिळालेला नाही. लिलाव झालेल्या आठ वाळू गटांतून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल मिळालेला आहे.

Web Title: More than half of the groups did not respond, even though the sand extraction deadline had passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.