स्वच्छतागृहांमध्ये झाली दुकाने तयार, तर गोलाणी मार्केटमधील निम्म्यापेक्षा अधिक स्वच्छतागृहे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:16 AM2021-03-27T04:16:05+5:302021-03-27T04:16:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये एका स्वच्छतागृहात नाश्त्याचे पदार्थ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील बहुतांश ...

More than half of the toilets in Golani Market are closed | स्वच्छतागृहांमध्ये झाली दुकाने तयार, तर गोलाणी मार्केटमधील निम्म्यापेक्षा अधिक स्वच्छतागृहे बंद

स्वच्छतागृहांमध्ये झाली दुकाने तयार, तर गोलाणी मार्केटमधील निम्म्यापेक्षा अधिक स्वच्छतागृहे बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये एका स्वच्छतागृहात नाश्त्याचे पदार्थ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील बहुतांश मार्केटमधील स्वच्छतागृहांची स्थितीदेखील याच प्रकारची आहे. फुले मार्केटमध्ये अनेक दुकानदारांनी स्वच्छतागृहांची जागा तोडून यामध्ये दुकाने तयार केली असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

शहरातील मार्केटमध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था जरी महापालिकेने केली असली तरी बहुतेक मार्केटमधील स्वच्छतागृह हे बंद अवस्थेतच आहेत. काही मार्केटमध्ये तर स्वच्छतागृहांचा वापर हा खाजगी कामांसाठी होत आहे. तर काही मार्केटमध्ये तर स्वच्छतागृह तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत.

गोलाणीमधील निम्मे स्वच्छतागृह बंद

१. शहरातील गोलाणी मार्केट हे मोबाइल हब म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जाते. या मार्केटमध्ये दिवसाला हजारो नागरिक भेट देतात तसेच या मार्केटमध्ये दररोज लाखोंची उलाढाल होत असते. मात्र, अशा मार्केटमध्ये देखील स्वच्छतागृहांची स्थिती फारच विदारक आहे.

२. या मार्केटमध्ये तीस स्वच्छतागृहे आहेत. मात्र, त्यापैकी १८ ते १९ स्वच्छतागृहे ही बंद अवस्थेत आहेत. तर उर्वरित स्वच्छतागृहांची अवस्था फारच दयनीय असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.

३. या मार्केटमधील अनेक स्वच्छतागृहांना कुलूप लावण्यात आले आहे. तसेच हे कुलूप कुणी लावले हे अनेकांना माहितीदेखील नाही. तसेच या स्वच्छतागृहांमध्ये स्थानिक व्यापारी आपला माल ठेवतात, अशीही माहिती या मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी दिली आहे.

फुले मार्केटमधील स्वच्छतागृहांमध्ये तयार झाली दुकाने

शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये एकूण १८ स्वच्छतागृह आहेत. त्यापैकी केवळ तीन ते चार स्वच्छतागृहे सुरू आहेत. अनेक स्वच्छतागृह बंद अवस्थेत आढळून आले. तर काही स्वच्छतागृह आधीच्या मार्केटमध्ये होते. मात्र, सद्य:स्थितीत त्या स्वच्छतागृहांमध्ये दुकाने तयार झाली असल्याचे निदर्शनास आले. महापालिका प्रशासनाला कोणतीही सूचना न देता अनेक दुकानदारांनी स्वच्छतागृह तोडून त्या ठिकाणी दुकाने तयार केली असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे याठिकाणी स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर अनेक व्यापारी व नागरिक महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करत असतानादेखील या ठिकाणच्या दुकानदारांवर कोणतीही कारवाई महापालिकेने आतापर्यंत केलेली आढळून येत नाही. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने फुले मार्केटमधील स्वच्छतागृहांच्या जागेवर तयार करण्यात आलेले दुकाने तोडण्याचा ठराव केला होता. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

प्रत्येक मार्केटमध्ये स्वच्छतागृहांमधील जागांवर झालेले अतिक्रमण

महात्मा फुले व गोलाणी मार्केट या मोठ्या मार्केटसह शहरातील इतर मार्केटमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. स्वच्छतागृहांचा वापर प्रत्यक्षात होत नसल्याचे आढळून आले आहे. अनेक स्वच्छतागृहांचा वापर मार्केटमधील अनेक दुकानदार आपला माल भरण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले. बीजे मार्केट असो वा स्टेडिअम कॉम्प्लेक्समधील मार्केट असो, प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये अतिक्रमणाची समस्या निर्माण झाली आहे. यावर महापालिका प्रशासन कारवाई करेल का, तसेच या अतिक्रमणधारकांना कोणाचा पाठिंबा आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: More than half of the toilets in Golani Market are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.