कोल्हे प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गाव झाले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 06:53 PM2019-11-03T18:53:51+5:302019-11-03T18:54:44+5:30

कोल्हे मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडले आणि हा प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी शनिवारी रात्री गाव सोडले.

More than half of the village has been submerged due to fears of a fog project | कोल्हे प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गाव झाले खाली

कोल्हे प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गाव झाले खाली

Next
ठळक मुद्देकोल्हे प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक पडले ८ ते १० फुटांचे मोठे खड्डे शनिवारी रात्री गाव सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी परतले ग्रामस्थ

रोशन जैन
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव : नांदोळ नदीवरील कोल्हे मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडले आणि हा प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी शनिवारी रात्री गाव सोडले.
पिंपळगाव हरेश्वरपासून पाच किलोमीटर अंतरावर कोल्हे गाव वसले आहे. या गावातील कोल्हे मध्यम प्रकल्प अवकाळी पावसामुळे पूर्णपणे भरला आहे. २ रोजी नांदोळ नदीला मोठा पूर आलेला होता. अशातच प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी दुपारी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. यावर गावातील नागरिकांनी एकत्र येऊन तो खड्डा बुजण्याचा प्रयत्न केला आणि तत्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला.
संबंधित अधिकाºयांनी शनिवारी रात्रीच भेट दिली. त्यात पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वंजारी, कार्यकारी अभियंता शिंदे, पाचोरा येथील मोरे, पाचोरा येथील तालुका निरीक्षक ए.एन.शिंदे, दिलीप धोबी, पाटकरी यांचा समावेश आहे.
प्रकल्प फुटल्याच्या भीतीने कोल्हे गावातील जवळ जवळ अर्ध्यापेक्षा अधिक नागरिकांनी बाहेरगावी आपापल्या नातेवाईकांकडे प्रस्थान केले. शनिवारी रात्री निम्म्यापेक्षा अधिक गाव खाली झाल्यानंतर भीती दूर झाली आणि दुसºया दिवशी रविवारी सर्व ग्रामस्थ कोल्हे गावी परतले.
गावाच्या मध्यभागी असलेल्या या नदीवरील फरशीचे डांबर व सिमेंट काँक्रिट वाहून गेल्याने दोन्ही गावातील संपर्क तुटलेला आहे. फरशीला तडादेखील गेलेला आहे.
या वर्षी या प्रकल्पातून खूप मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे भगदाड यापूर्वी पाच ते सात वर्ष अगोदर पडले होते. त्यावेळी नागरिक व अधिकाºयांनी ते बुजले. मात्र आता पुन्हा धरणाच्या भिंतीवर मोठे खड्डे पडल्यामुळे संपूर्ण कोल्हे गावात भीतीचे वातावरण आहे. याकडे त्वरित संबंधित अधिकाºयांनी लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

 

Web Title: More than half of the village has been submerged due to fears of a fog project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.