मोरे, जोगी, भोळे, वाणी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:50+5:302021-09-22T04:18:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात पार पडला. यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा नायब तहसीलदार भानुदास शिंदे, मानवी अन्याय निवारण केंद्राचे उमाकांत वाणी, हरिश्चंद्र बाविस्कर यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते त्र्यंबक नगर प्राथमिक शाळेचे उपशिक्षक नीलेश रामाराव मोरे, खुबचंद सागरमल प्राथमिक शाळेचे उपशिक्षक निखिल लक्ष्मण जोगी, का. ऊ. कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक गौरव सुभाष भोळे यांना साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाचे शिपाई सुधीर सोपान वाणी यांना सरदार वल्लभभाई पटेल आदर्श सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.