जेवढय़ा जास्त अडचणी, तेवढेच चांगले अधिकारी बनाल- प्रांजल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 11:17 AM2017-06-08T11:17:58+5:302017-06-08T11:17:58+5:30
दीपस्तंभतर्फे युपीएससीतील गुणवंताचा सत्कार
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.8-स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेकदा विद्याथ्र्याना अपयश येत असते. मात्र अशावेळी विद्याथ्र्यानी स्वत:वर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण स्पर्धा परीक्षेच्या काळात जेवढय़ा जास्त अडचणी येतील तेवढेच चांगले अधिकारी बनाल असा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 124 व्या रॅँकने उत्तीर्ण झालेल्या प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील यांनी विद्याथ्र्याना दिला.
दीपस्तंभ फाउंडेशन कडून युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशवंत विद्याथ्र्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवारी शहरातील कांताई सभागृहात सभागृहात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील , खासदार ए.टी.पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, प्रा.सुरेश पांडे, तसेच यु.पी.एस.सी उत्तीर्ण सौरभ सोनवणे, आशीष पाटील, महेश चौधरी, अभ्युद्य साळुंखे आदी उपस्थित होते.
नियमित प्रयोग करत रहा
पुढे बोलताना प्रांजल पाटील म्हणाल्या की, जग हे एक प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेत सातत्याने प्रयोग करत राहणे महत्त्वाचे आहे. प्रयोग करत रहाल तर नक्की नवीन शोध लागतो असा सल्लाही त्यांनी उपस्थित विद्याथ्र्याना दिला. युपीएससी ची परीक्षा ही लोकसेवेची मोठी संधी आहे आणि लोकसेवेची संधी मानूनच यु.पी.एस.सी परीक्षेची तयारी करा असा सल्लाही त्यांनी दिला. सूत्रसंचालन प्रा.यजुर्वेद्र महाजन व राजेंद्र चव्हाण यांनी केले.