रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या आणखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:09+5:302021-04-30T04:20:09+5:30
तिसरा गुन्हा दाखल : दोघांना सोडले जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच असून जिल्हा पेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी आणखी ...
तिसरा गुन्हा दाखल : दोघांना सोडले
जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच असून जिल्हा पेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी आणखी एकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेमडेसिविरचा हा याच पोलीस स्टेशनला तिसरा गुन्हा आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी तीन जणांना चौकशीसाठी आणण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत बंदद्वार ही चौकशी चालली. त्याबाबत पोलिसांनी पत्रकारांना माहिती देणे टाळले होते. गुन्हा दाखल केल्याचीही माहिती लपविण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी मुर्शरफ खान मसूर खान (वय २६, रा. मासुमवाडी) या तरुणाला सिंधी कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्याकडून एक रेमडेसिविर जप्त करण्यात आले आहे.
कोरोना बाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठा काळाबाजार करून जादा भावाने विक्री होत आहे. बुधवारी सांयकाळी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एक तरुण रेमडेसिविर इंजेक्शन चढ्या भावाने विक्री करत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांनी मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी सापळा रचून सायंकाळी ४ वाजता मुर्शरफ खान मसूर खान याला अटक करून त्याच्या ताब्यातील ५ हजार ४०० रुपये किमतीचे रेमडेसेविर इंजेक्शन हस्तगत केले आहे. याप्रकरणी प्रशांत पाठक यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.