देशभरातील अडीचशेहून अधिक प्राध्यापकांचा नॅशनल सेमिनारमध्ये सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:00+5:302021-01-13T04:40:00+5:30
जळगाव - केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनल क्वाॅलिटी अशुरन्स विभाग व राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता ...
जळगाव - केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनल क्वाॅलिटी अशुरन्स विभाग व राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय सेमिनार नुकतेच पार पडले.
यावेळी ऑनलाइन सेमिनारचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. के. पी. राणे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय सुगंधी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘नॅक’ संस्थेचे सल्लागार डॉ. गणेश हेगडे व सहसल्लागार डॉ. ए. व्ही. प्रसाद यांनी ‘नॅक’ प्रक्रियेबद्दल विस्तृत माहिती दिली. देशभरातून अडीचशेहून अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता. प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा विखार यांनी केले. प्रा. प्रियांशी बोरसे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. मनोज साळुंखे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रा. कल्पेश महाजन, प्रा. अविनाश सूर्यवंशी, प्रा. दीप्ती पाटील आदींनी परिश्रम घेतले.