भूलशास्त्र दिनानिमित्त प्रभातफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:38 PM2019-10-17T12:38:57+5:302019-10-17T12:39:17+5:30
जळगाव : जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त जळगाव भूलशास्त्र संघटनेच्यावतीने प्रभातफेरी काढण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. भाऊंचे उद्यानापासून प्रभातफेरीस सुरुवात होऊन ...
जळगाव : जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त जळगाव भूलशास्त्र संघटनेच्यावतीने प्रभातफेरी काढण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.
भाऊंचे उद्यानापासून प्रभातफेरीस सुरुवात होऊन गांधी उद्यान येथे समारोप झाला. या ठिकाणी सभा होऊन नागरिकांना माहितीपत्रके वितरीत करण्यात आली. विविध संदेश देणारे माहितीफलक डॉक्टरांचे हाती होते.
भूलशास्त्राविषयी असलेले गैरसमज दूर करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वेदनारहित प्रसूती, जीवनरक्षक प्रणाली, बंद हृदय पुनर्जीवित करण्याची प्रक्रिया, शस्त्रस्क्रिये आधी काय काळजी घ्यावी, या विषयीची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. सोबतच भूल देते वेळी वापरण्यात येणारी उपकरणे दाखवून त्यांची माहिती देण्यात आली.
प्रमुख अतिथी आयएमएचे सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील होते. त्यांनी भूलशास्त्र हे वैद्यकीय क्षेत्राला मिळालेले वरदान आहे आणि भूलशास्त्र तज्ज्ञ हे यशस्वी शस्त्रक्रियेच्या पडद्यामागील हिरो आहेत, असे नमूद केले.
यावेळी महाराष्ट्र भूलतज्ज्ञ संघटनेचे सदस्य डॉ.नरेंद्र ठाकूर, जळगाव भूलशास्त्र तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया पाचपांडे, सचिव डॉ. धिरज चोधरी, डॉ.हरणखेडकर, डॉ.नितिन महाजन, अमित हिवरकर, डॉ .पंकज बढे, डॉ .लीना पाटील, डॉ वर्षा कुलकर्णी, डॉ. सोनाली महाजन, डॉ. पूजा बढ, डॉ. ललित पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. अरुण पाटील, डॉ. विनोद किनगे, डॉ. जयश्री राणे, डॉ. आरती पाटील, डॉ. गणेश भारुड, डॉ. विभा महाजन, डॉ. साठे, डॉ. रोहिणी चोधरी, डॉ. नितिन खडसे, डॉ. नीला पाटील, डॉ प्राजक्ता जावळे, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. विलास भोळ, डॉ. अनिता भोळे, डॉ. तिलोत्तमा गाजरे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी. डॉ.प्रियांका पाटील, डॉ सुवर्णा जोशी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. धीरज चौधरी यांनी केले.
बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने रविवारी मार्गदर्शन
जळगाव : मुलांची बदलणारी मानसिकता व पालकत्व या विषयी माहिती देण्यासाठी जळगाव बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने रविवार, २० आॅक्टोबर रोजी ‘बदलणारे पालकत्व काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयएमए हॉल येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून यामध्ये बाल संगोपन, मुलांच्या मानसिक आजाराचे तज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी हे मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय शास्त्री यांनी केले आहे.