चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:25 PM2019-09-26T22:25:34+5:302019-09-26T22:26:16+5:30

सर्वात कमी दिव्यांग मतदार जामनेर तालुक्यात

Most Disability voters in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार

चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार

Next

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या ११ मतदार संघात १४ हजार ८५२ दिव्यांग मतदार असून यामध्ये सर्वाधिक दोन हजार १२३ दिव्यांग मतदार चाळीसगाव विधानसभा मतदार संघात आहेत तर सर्वात कमी ८३३ दिव्यांग मतदार जामनेर मतदार संघात आहेत.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासह मतदान केंद्र, त्यांची संख्या, अधिकारी या सर्वांची तयारी पूर्ण केली आहे.
मतदान नोंदणी करताना दिव्यांग बांधवांचाही मतदानासाठी सहभाग वाढावा म्हणून प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार त्याला प्रतिसाद मिळून दिव्यांग मतदार बांधवांचीही संख्या चांगलीच वाढली.
विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील एकूण सहा विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांची संख्या आठ हजार २१० आहे तर रावेर लोकसभा मतदार संघात केवळ जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एकूण ६ हजार ६४२ दिव्यांग मतदार आहेत. दोन्ही लोससभा मतदार संघापैकी रावेर लोकसभा मतदार संघात मलकापूर विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांची संख्या वेगळी आहे.
चाळीसगाव मतदार संघाची आघाडी
दिव्यांग मतदारांची संख्या जास्त असण्यात चाळीसगाव मतदार संघ आघाडीवर आहे. तेथे दोन हजार १२३ दिव्यांग मतदार आहेत. त्या खालोखाल अमळनेर मतदार संघात दोन हजार ९०, चोपडा मतदार संघात एक हजार ८१४ दिव्यांग मतदार आहेत. सर्वात कमी म्हणजेच ८३३ दिव्यांग मतदार जामनेर तालुक्यात आहेत.

मतदारसंघ निहाय दिव्यांग मतदार

मतदार संघ दिव्यांग मतदार
चोपडा - १८१४
रावेर - १०८३
भुसावळ - १६९५
जळगाव शहर - ८७१
जळगाव ग्रामीण - १०८४
अमळनेर - २०९०
एरंडोल - १०५५
चाळीसगाव - २१२३
पाचोरा - ९८७
जामनेर - ८३३
मुक्ताईनगर - १२१७
एकूण - १४८५२

Web Title: Most Disability voters in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव