बहुता सुक्रुताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी..., कीर्तन सोहळ््यात पुत्राच्या कीर्तनास मातेची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:54 PM2018-02-10T12:54:42+5:302018-02-10T12:59:09+5:30

अनोखी अनुभुती

Most of the likes of Sukrutah, Vitthali Likes | बहुता सुक्रुताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी..., कीर्तन सोहळ््यात पुत्राच्या कीर्तनास मातेची साथ

बहुता सुक्रुताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी..., कीर्तन सोहळ््यात पुत्राच्या कीर्तनास मातेची साथ

Next
ठळक मुद्देमनामनातील संशय दूर करासंतप्रवाहात आल्यास अहंकाराची समाप्तीशनिवार व रविवारी संध्याकाळी बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि. १० - ‘बहुता सुक्रुताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी...’ या हरिपाठातील ओवीचा अनुभव शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या कीर्तन सोहळ््यात शुक्रवारी भाविकांना आला. चिन्मय महाराज हे कीर्तन सादर करीत असताना त्यांना आज त्यांच्या आई भगवती सातारकर - दांडेकर यांनी साथसंगत केली, या वेळी आपसूकच भाविकांच्या तोंडून हरिपाठातील या ओवी आल्या.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एल. के. फाउंडेशनतर्फे बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रोज सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या वेळात शिवतीर्थ मैदानावर आयोजित केला आहे. यामध्ये शुक्रवारी तिसºया दिवशी चिन्मय महाराज यांचे कीर्तन झाले.
मनामनातील संशय दूर करा
आज आई-वडिलांवर विश्वास दाखविला जात नाही. मनामनातील संशय दूर केल्यास येथूनच परमार्थाची सुरुवात होते, असे चिन्मय महाराज यांनी सांगितले. नाती बनविण्यासाठी वर्ष लागून जातात, मात्र संशय निर्माण झाल्यास काही क्षणात नाती नष्ट होतात, असे सांगून श्रद्धा टिकविण्यासाठी संशय दूर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संतप्रवाहात आल्यास अहंकाराची समाप्ती
संसाराकडे वाहत जाते ती धारा तर देवाकडे वाहत जाते की राधा (भक्ती) असल्याचे सांगून चिन्मय महाराज म्हणाले की, गंगेत उडी मारुन बाहेर येणे सोपे आहे, मात्र वारकरी संप्रदायात, संतप्रवाहात उडी मारणे कठीण आहे. मात्र संतप्रवाहात आले तर अहंकार आपसूकच समाप्त होतो, असे वर्णन त्यांनी वारकरी संप्रदायाचे केले.
टाळ््यांची साद व हास्याची लकेर
चिन्मय महाराज यांचे कीर्तन सुरू असताना त्यांनी अनेक उदाहरणे देत टाळ््यांची मोठी दाद मिळविली. या सोबतच विविध उदाहरणावरून भाविकांमध्ये हास्याची लकेर उमटली.
विठ्ठल गजरावेळी टाळ, मृदुंग, वीणा, तबला आणि चिन्मय महाराज यांच्या आलाप यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती.
या वेळी गुलाबराव सनस (तबला) व नितीन भंडारी (पखवाज) यांनी साथसंगत केली व सोबत तरुण व बाल वारकरी टाळ-मृदुंगाची साथ देत होते.

शनिवार व रविवारी संध्याकाळी बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन होणार आहे.

 

Web Title: Most of the likes of Sukrutah, Vitthali Likes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव