जळगाव शहरात सर्वाधिक मतदार संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:25 AM2019-02-02T11:25:46+5:302019-02-02T11:26:29+5:30

अंतिम यादी

Most voters in Jalgaon city | जळगाव शहरात सर्वाधिक मतदार संख्या

जळगाव शहरात सर्वाधिक मतदार संख्या

Next
ठळक मुद्दे राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेतली माहिती



जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदार हे जळगाव शहर मतदार संघात आहेत. या मतदार संघात ३ लाख ८६ हजार ७३४ एवढे मतदार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी गुरूवारी जाहीर झाली. त्यानंतर शुक्रवारी विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादीतील काही दुरूस्त्या करण्यात आल्यानंतर या ११ विधानसभा मतदार संघातील मतदारांची आकडेवारी निश्चित झाली.
राजकीय पक्षांची धाव
लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती जाणून घेतली.
अशी आहे तालुकानिहाय मतदार संख्या
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. चोपडा विधानसभा मतदार संघ ३ लाख ५ हजार ५१३, रावेर २ लाख ९५ हजार ७३५, भुसावळ - ३ लाख ५९, जळगाव शहर ३ लाख ८६ हजार ७३४, जळगाव ग्रामीण ३ लाख १२ हजार ६२१, अमळनेर २ लाख ८९ हजार ५७०, एरंडोल २ लाख ७६ हजार ७६८, चाळीसगा ३ लाख ३८ हजार २६८, पाचोरा ३ लाख ५ हजार ७७४, जामनेर ३ लाख ५ हजार १४३, मुक्ताईनगर २ लाख ८९ हजार ८३ अशी मतदार संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ३४ लाख ५ हजार २६८ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये पुरूष मतदारांची संख्या १७ लाख ७ हजार ९२७ एवढी असून स्त्री मतदारांची संख्या १६ लाख २६ हजार १५६ एवढी आहे. यंदा प्रथमच ८५ तृतीयपंथी मतदारांचीही नोंद मतदार यादीत आहे.

Web Title: Most voters in Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.