महिला दिनी केला वीर जवानांच्या माता व पत्नीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:35 PM2019-03-09T17:35:07+5:302019-03-09T17:35:28+5:30
विविध संस्था व संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन
भडगाव - कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत वीर जवानांच्या माता व पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील होते. पत्रकार सुधाकर पाटील, सैन्य दलात कार्यरत कैलास महाजन व नीलेश बोरसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात प्रथम शाळेतील महिला पालकांसाठी शाळेतर्फे भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. भडगाव शहरातील सैन्यदलात कार्यरत तसेच शहीद झालेल्या वीर माता, पत्नी यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. रांगोळी स्पर्धेत प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त महिला पालकांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तसेच संस्थेंच्या लाडकूबाई विद्यामंदिर भडगाव शाळेतील शिक्षिका सीमा पाटील यांना कै.आबासाहेब आर.आर.पाटील गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात. मनोगतात सैनिक मातांनी अत्यंत भावपूर्ण मनोगत व्यक्त करून सैनिकांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली. मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले तर छायाचित्रण सुयोग पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षक सचिन पाटील, रवंींद्र पांडे, अनंत हिरे, शिक्षिका संगीता शेलार, सुनिता देवरे, अनिता सैंदाणे, राहुल देशपांडे यांनी परिश्रम घेतले.