बालिकेचा मृत्यू प्रकरणात आई, वडिलांना चार दिवस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:18+5:302021-04-30T04:20:18+5:30
जळगाव : पिंप्राळा हुडकोतील कनीज फातेमा या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी आणि वडील जावेद अख्तर शेख व आई नजीया परवीन या ...
जळगाव : पिंप्राळा हुडकोतील कनीज फातेमा या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी आणि वडील जावेद अख्तर शेख व आई नजीया परवीन या दोघांना गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या दोघांविरुद्ध बुधवारी सदोष मनुष्यवध, बालकांचा संरक्षण कायदा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनीच सरकारकडून फिर्याद दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. बुधवारी दफन केलेला मृतदेह उकरून काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान दोघांनाही बुधवारीच अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी दोघांना न्यायालयात हजर केले.