आईने स्वत:च्या हिंमतीवर जगायला शिकविले
By admin | Published: May 14, 2017 12:20 PM2017-05-14T12:20:10+5:302017-05-14T12:20:10+5:30
आई सरोजनी हिच्या शिकविणीमुळे आज या पदार्पयत पोहचल्याचे महावितरण कंपनीचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी सांगितले
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 - आई माझा गुरू, आईच कल्पतरू याप्रमाणे मला घडविण्यात माङया आईचा खूप मोठा आह़े कुणाच्या उपकाराखाली न राहता, प्रामाणिकपणे मेहनत करून स्वत:च्या पायावर उभे रहा या आई सरोजनी हिच्या शिकविणीमुळे आज या पदार्पयत पोहचल्याचे महावितरण कंपनीचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी सांगितले.
मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, आई-वडील तीन भाऊ व दोन बहिणी असा परिवार होता़ आई व वडील दोघे शिक्षक़ सामान्य कुटुंबात वाढलो़ आई शिक्षिका असल्याने आमच्या शिक्षणाच्या बाबतीही तिने कुठेही तडतोड केली नाही़ बहिणीचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला़ यावेळी मी दहावीत होतो़ पॉलिटेकिAनसाठी मला सोलापूर येथे प्रवेश मिळाला होता़ सर्व कुटूंब दु:खात होत़े आईवर तर दु:खाचा डोंगर कोसळलेला होता़ अशात दु:ख विसरुन ती एकटी मला सोलापूर येथे सोडायला आली़ व पुन्हा गावाकडे परतली़ आई पासून दूर राहण्याचा पहिलाच अनुभव होता़ त्यामुळे आईला सोडताना रडू कोसळले होत़े अशी आठवणही जनवीर सांगतात़ वडीलांचा कॅन्सरने मृत्यू झाला़ यावेळी तिने स्वत:ला सावरत कधी वडीलांची आठवण येवू दिली नाही़ आईचे वय 77 वर्षे आह़े प्रत्येकाकडे जात़े नातवंडेही मोठय़ा पदावर असल्याचा तिला अभिमान वाटतो़ आयुष्यात थोडा त्रास होईल मात्र लाचारी पत्करू नका, हिंमतीने जगा ही तिची शिकवण आजही मनात कायम आह़े