गेल्या रविवारी दिवसभर फेसबुक आणि व्हॉटस् अॅप वरती ‘‘आई’’ या विषयावरच्या पोस्टस्चा धबधबा कोसळत होता. कुठल्या कुठल्या जुन्या कविता, छान छान सुभाषित, घरोघरीचे जुने- पाने फोटो यांची नुसती रेलचेल झाली होती. अर्थातच दुस:या हाताला म्हाता:या आईची दु:ख, वृद्धाश्रम, मुलांचे मतलबी वागणे.. यांचाही जागो जागी उद्धार झालाच. या सर्व गदारोळात नेहमीप्रमाणेच एक ठळक मुद्दा वादाचा ठरला. ‘मदर्स डे’ हा आपला सण नाही, मग तो आपण साजरा कां करायचा? त्याला उत्तर बहुदा हेच होतं, की सण कुणाचा का असेना? आई तर आपली आहे? मग काय हरकत आहे? मग मुद्दा आला तो ‘मातृदिना’चा. म्हणजे मराठी परंपरेनुसार असलेला श्रावणातला मातृदिन. त्यावर पुन्हा नेहेमीप्रमाणे टीका झाली की, कोणत्याही विषयात ‘आपली संस्कृती’ मध्ये आलीच पाहिजे असा काही नियम आहे कां? (अशाने मग पुरोगामी काका-मावश्यांना भारी राग येतो हो!) एकूण काय.. वादच वाद- आईशप्पत!
या संदर्भात (वैचारिक विधान करण्यापूर्वी हा शब्द हवाच) काही मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. ‘मदर्स डे’ आणि ‘मातृदिन’ ची तुलनाच होऊ शकत नाही. ‘मातृदिन’ हा ‘मनुवादी’ परंपरेने बहुजनांवर लादलेला सण अहे. तर ‘मदर्स डे’ हा एका जागतिक कल्पनेचा ग्लोबल हुंकार आहे. मातृदिन हा फक्त मातेचं महत्त्व सांगतो, पण मदर्स डे हा ‘टू ऑनर द मदरहुड’ असा असतो. यात फारच वैचारिक फरक आहे. मातृदिन म्हणजे भगव्या ङोंडय़ात गुंडाळून आलेला सामाजिक धोका आहे. आणि मदर्स डे ही अमेरिकेच्या ङोंडय़ात गुंडाळून आलेली प्रेमळ भेट आहे. ती हसतमुखाने स्वीकारण्यातच भारताची सामाजिक उन्नती आहे. (मागे एकदा अशा भाषेत फेसबुकवरती पोस्ट टाकली होती. त्यानंतर मला, ‘‘याला उपरोध म्हणतात’’ असं स्वतंत्र डिक्लेरेशन द्यावं लागलं होतं.. असो!)
खरं तर आईची आठवण काढण्यात गैर काहीच नाही ती कोणत्या निमित्ताने काढतोय, हे ही महत्त्वाचं नाही. ती मे महिन्यातल्या दुस:या रविवारी काढली, म्हणून श्रावण अमावस्येला काढायची नाही, असंही काही नाही. केवळ ‘अमेरिकन’ आहे म्हणून मदर्स डे खटकतो, असं तर मुळीच नाही. तो खटकतो, तो त्याला आलेलं सवंग, बाजारू स्वरूप बघून. आणि हा आक्षेप आजचा नाही- पूर्वीचाच आहे. आपल्यापैकी किती जणांना ‘मदर्स डे’चा इतिहास माहिती असेल! ज्या ‘अॅना जार्विस’ या महिलेने अमेरिकेत 1908 साली सर्वप्रथम हा ‘मदर्स डे’ साजरा केला. तिने स्वत:च नंतर, 1923 च्या सुमारास त्याविरुद्ध मोहीम उघडली. कारण असं की, 1920 र्पयत हा ‘मदर्स डे’ इतका पसरला की, हॉलमार्क सारख्या कंपन्यांनी ‘मदर्स डे’ची शेकडो प्रकारची शुभेच्छा पत्रे, भेटवस्तू बाजारात आणल्या ही नफेखोरी, हे व्यापारीकरण बघून अॅना उद्विगA झाली. तिचं म्हणणं होतं, की मी या प्रथेला सुरुवात केली, ती कौटुंबिक स्नेहबंध टिकून रहावेत य उद्देशाने. तिचा आग्रह होता की तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात एक साधी चिठ्ठी तुमच्या आईला लिहा- पण स्वत: लिहा. विकत आणू नका. या प्रथेचं खाजगी स्वरूप अधोरेखित व्हावं म्हणून अॅनाने चक्क ‘मदर्स डे’ या नावाचा स्वामित्त्व हक्क मिळवला होता. त्यात तिने ‘मदर्स’ लिहिताना षष्ठीवाचक चिन्ह आधी टाकलं (अॅपॉस्ट्रॉफी एस) ते मुद्दाम तसं टाकलं. तिच्या म्हणण्यानुसार हा उत्सव, प्रथा आपल्या घरातल्या, आपल्या आईच्या सन्मानासाठी आहे- एकटीच्या सन्मानासाठी. जगभरच्या आयांसाठी सरसकट कृतज्ञता म्हणून ती नाही. या प्रथेला खाजगी रूपातच राहू द्या!
प्रत्यक्षात असं झालं का? अजिबात नाही. उलटपक्षी या प्रथेचं स्वरूप दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापारी, सार्वजनिक झालं, ज्या काळी केवळ छापील शुभेच्छापत्र होती, तेव्हा त्यांच्या संख्येवर जरा तरी मर्यादा होती. आता जेव्हा ‘डिजिटल’ शुभेच्छा पत्रांचा जमाना आलाय, तेव्हा तर काही मर्यादाच राहिलेली नाही. ‘‘आई’’ या नावाला ‘एनकॅश’ करताना कोणीही मागे-पुढे पहात नाही, हजारो प्रकारची रंगीबेरंगी शुभेच्छापत्रं, जी.आय.एफ. फाईल्स्, तयार कविता अशा अनेक साधनांनी हा मदर्सडे कमालीचा सवंग, वरवरचा आणि भावनाशून्य केलाय.
‘‘मी माङया आईवर किती प्रेम करतो किंवा करते’’ हे सा:या जगाला ओरडून सांगण्याचा जाहीर अट्टाहास बघितला की, कुठेतरी शंका येते, आई बरोबर प्रत्यक्षात असलेलं वागणं कुठेतरी बोचतंय, ती बोच कमी करण्याचा हा प्रय} तर नाही?
खरं सांगू? ‘‘जपायचंय.. तुला..’’ असं ठसक्यात म्हणणारी मुलं फक्त जाहिरातीत असतात. प्रत्यक्षात नाही. ख:या आयुष्यात मुलं आपल्या आईला काहीही बोलून न दाखवता जपत असतात. गंमत म्हणजे, अशी मुलं ‘मदर्स डे’ ला फेसबुकवर आईसोबत ‘सेल्फी’ सुद्धा टाकत नाहीत!- अॅड.सुशील अत्रे
Web Title: 'Mother's Day' and 'Mother's Day'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.