मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाची झडप

By विजय.सैतवाल | Updated: May 12, 2024 23:52 IST2024-05-12T23:51:38+5:302024-05-12T23:52:02+5:30

कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार : पती व तीन वर्षीय मुलगी जखमी

Mother's Day is a time for a pregnant woman | मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाची झडप

मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाची झडप

जळगाव : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दिपाली योगेश कोळी (२२, रा. जुना असोदा रोड, जळगाव) ही आठ महिन्याची गर्भवती महिला जागीच ठार झाली. तिचे पती व तीन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास वराड गावाजवळ घडली. मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाने झडप घातल्याने एकाच वेळी दोन जीव गेले तर तीन वर्षीय मुलीचे मातृछत्र हरवले आहे.

जूना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (२८) हे  खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहे.   ते पत्नी दिपाली व तीन वर्षाची मुलगी काव्या हीला घेवून निमगव्हाण येथे नातेवाईकांकडे भेटण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १९, सीएफ ९७९७)   वराड गावाजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ महिन्याची गर्भवती असलेल्या दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती योगेश व मुलगी काव्या हे दोघ गंभीर जखमी झाले.

अपघातात महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Mother's Day is a time for a pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव