आईच्या संस्काराचा धाक कायम
By admin | Published: May 14, 2017 04:57 PM2017-05-14T16:57:23+5:302017-05-14T16:57:23+5:30
आपली कला असली तरी आपण आपल्या कृतीतून लोकांचा विश्वास कशाप्रकारे संपादन हे ही संस्कार आईमुळेच मिळाले.
भिका पाटील / ऑनलाइन लोकमत
शिंदखेडा, जि. धुळे, दि. 14 - राजकरणाचा भक्कम पाया उभा राहतो तो लोक संपर्कावरच, हे संस्कार आईने माङयावर केले. लोक जोडणं ही आपली कला असली तरी आपण आपल्या कृतीतून लोकांचा विश्वास कशाप्रकारे संपादन हे ही संस्कार आईमुळेच मिळाले. प्रसंगी मेणासारखी मऊ आणि कठोरही अशा आईच्या संस्काराचा धाक कायम असल्याचे राज्याचे पर्यटन व रोहियो मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
माझी आई नयनकुंवर रावल यादेखील प्रत्येक आईसारख्याच आई आहेत. सामान्य आईला ज्या-ज्या जबाबदा:या पार पाडाव्या लागतात त्याच जबाबदा:या माङया आईने पार पाडल्यात. पहिलं संस्काराच विद्यापीठ माझी आई नवनकुंवर आहेत. मुलाला वडिलांचा धाक असतो किंवा आईचा धाक असतो. यात थोडा फरक असतो तो म्हणजे वडिल घरात किती वेळ देतात यावरून ते ठरतं. माङो पिताश्री सरकारसाहेब रावल हे भारतातील यशस्वी उद्योगपती आहेत. त्याच्या जोडीला कुटुंबातील इतर जबाबदा:या, समाजकारण, राजकारण, शैक्षणिक संस्था अशा विविध पातळ्यांवर कार्य करीत असल्याने अत्यंत व्यस्त तरीदेखील आमच्यासाठी वेळ दिलाच आहे, हे कबुल करायला हवे. पण सगळ्यात जास्त वेळ आईचा म्हणून आईचा धाक अधिक वाटतो. आईची जेवढी भिती वाटते तेवढंच प्रेम आईनेही दिलं परंतु संस्काराचा विषय आला की आई अत्यंत कठोर, यात तडजोड नाही. राजघराण्याचे संस्कार आमच्यावर बालवयातच दृढ झालेत, परंतु समाजाशी नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. माङया मुलाला कुणी भिगा म्हणून नये, त्याची खिल्ली उडवू नये म्हणून साने गुरुजींच्या आईने त्यांना पोहता यावे म्हणून विहिरीत ठकलले. काळ बदलला शिक्षण हेच कतृत्वाचे साधन झाल्यावर मात्र वयाच्या पाचव्या वर्षीच आईने मला घराबाहेर काढले. ज्या वयात आईच्या कुशीत शांत झोपावं त्या वयात मी शिक्षणासाठी होस्टेलवर आलो. पुढे शिक्षणासाठी पायपीट करीत अगदी परदेशातही गेलो. त्यावेळी माङया आईने माङया कल्याणासाठी आपल्या ममतेला आडवे येऊ दिलं नाही. बाहेर जाताना तिने तिच्या डोळ्यातील अश्रू माङया दृष्टीस पडू दिले नाहीत. त्याचे कारण एकच की मी खचू नये म्हणून.
आजही विविध कामानिमित्ताने दिवसातील 20 तास बाहेर राहतो. परगावच्या दौ:यावर असतो त्यावेळी आईचे डोळे सतत माङयाकडे लागलेले असतात. सतत फोनवरून संपर्कात असते. एकच प्रश्न, एक वाक्य, भाऊ वेळेवर जवेण घ्या. स्वत:ची काळजी घ्या.’ आईचे शब्द ऐकले की माझा सर्व थकवा गायब होतो. एक विशिष्ट ऊर्जा मला प्राप्त होते. मी आजही आईच्या आ™ोत आहे आणि राहिन. लहानपणी आईचा मला धाक असे तसे तो आजही मंत्री असतानाही आहे. म्हणूनच मला कोणतेही व्यसन जडले नाही. आईच्या आ™ोत राहणा:या कोणत्याही माणसाला व्यसन जडणार नाही. मातृत्त्व दिनाच्या निमित्ताने मी माङया भावना व्यक्त केल्या, असे नव्हे तर या भावना सतत माङया ह्दयात असतात. मी जगातला सर्वात श्रीमंत आहे. कारण मी माङया आईच्या आ™ोत व सहवासात आहे. ही श्रीमंत देवकृपेने सगळ्यांना मिळो. ईश्वराचे प्रतिरूप माङया आईस उदंड आयुष्य लाभो ही प्रभू चरणी प्रार्थना.