आईकडूनच मिळाले परिश्रमाचे बाळकडू

By admin | Published: May 14, 2017 11:45 AM2017-05-14T11:45:45+5:302017-05-14T11:45:45+5:30

परिश्रमाचे हे बाळकडू मला लहानपणी आईकडूनच मिळाले,

The mother's hard earned money | आईकडूनच मिळाले परिश्रमाचे बाळकडू

आईकडूनच मिळाले परिश्रमाचे बाळकडू

Next

विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 14 - माझी नोकरी, कार्य  म्हणजे सेवेचा भाग आणि यासाठी आवश्यक असतात ते परिश्रम. परिश्रमाचे हे बाळकडू मला लहानपणी आईकडूनच मिळाले, अशी भावना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांनी व्यक्त केली.
मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  डॉ. भामरे म्हणाले की, एका सामान्य कुटुंबात जन्म झाल्यानंतरही केवळ आईचे आशीर्वाद, शिकवण, संस्कार यामुळे मी चांगले शिक्षण घेऊन ही ङोप घेऊ शकलो. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे जन्म झाल्यानंतर आईने मोठय़ा लाडात वाढविले. या लाडासोबत आईच्या बालसंस्काराची किनारही त्याला होती.  पुढे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण सटाणा, जि. नाशिक येथे झाल्यानंतर पुण्याला वैद्यकीय शिक्षणासाठी गेलो. त्या वेळी आईला मोठी काळजी होती, असे आवजरून डॉ. भामरे यांनी सांगितले.  आईने सदैव एक शिकवण दिली ती म्हणजे, साधे रहा, नेहमी मदत करावी, कोणाचे नुकसान अथवा वाईट करू नये, सेवा ही महत्त्वाची आहे. आईच्या या शिकवणीमुळेच मी जिल्हा शल्य चिकित्सक असलो तरी रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य देत असतो, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.  आईच्या शिकवणीमुळे संस्कारीवृती जपण्याकडे लक्ष देत असल्याचे डॉ. भामरे म्हणाले.      

Web Title: The mother's hard earned money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.