मातेनेच दिली कष्टाची शिकवण

By Admin | Published: May 14, 2017 04:51 PM2017-05-14T16:51:27+5:302017-05-14T16:51:27+5:30

गेल्या 65 वर्षे मी आणि सर्व भावंडे तिच्या सावलीत आहोत़ तिने आमचे संगोपन जगातल्या इतर आईंप्रमाणेच जिव्हाळ्याने केल़े

Mother's teachings of hard work | मातेनेच दिली कष्टाची शिकवण

मातेनेच दिली कष्टाची शिकवण

googlenewsNext

सुनील साळुंखे / ऑनलाइन लोकमत

शिरपूर, जि. धुळे, दि. 14 - मातृदिनाची संकल्पना पाश्चात्य आह़े मात्र आपल्याकडे रोजच ‘मातृदिन’ असतो़ मातृभावना ही वैश्विक भावना आह़े माझी आई हेमंतबेन पटेल आज 85 वर्षाच्या आहेत़ गेल्या 65 वर्षे मी आणि सर्व भावंडे तिच्या सावलीत आहोत़ तिने आमचे संगोपन जगातल्या इतर आईंप्रमाणेच जिव्हाळ्याने केल़े
कामानिमित्त मी बाहेरगावी असलो तरी रोज रात्री आई आस्थेने विचारते, ‘बेटा खाना हो गया?’ मी हो म्हटले की तिचे पोट भरत़े आईजवळ असलो की आग्रहाने आजही सूनांना सांगून खाऊ घालत़े
आमच्यावर बालपणापासूनच तिने चारित्र्याचे संस्कार केले आहेत़ नीतीचे धडे दिले आहेत़ प्रतिकूलतेतही मनाचा संयम सोडायचा नाही़ कठोर परिश्रमाशिवाय या जगात काहीच मिळत नाही़ एखादे अपयश हे तात्पुरते असू शकत़े प्रयत्न थांबवायचे नसतात़ अत्यंत मृदु असलेले पाणी सततच्या परिश्रमाने एक दिवस खडकही फोडतेच़ हे आईने सांगितलेले तत्त्वज्ञान मला आजही धीर देत़े मी यशाप्रसंगीही आईची मूर्ती डोळ्यासमोर आणतो, तसेच एखादे कार्य मनासारखे झाले नाही, त्यावेळीही आईचीच मूर्ती डोळ्यासमोर आणतो़ त्यामुळे माझी मरगळ दूर होत़े आम्हा सर्वच भावंडांसाठी ती चैतन्याचा स्त्रोत आह़े
आज पटेल कुटुंबाचा जो काही आलेख असेल त्यात माङया ‘बा’ चा सिंहाचा वाटा आह़े परिश्रम, जिद्द, चिकाटी, नीतिमत्ता यांचे बाळकडू तिने पाजले नसते तर कुटुंबाची आजची ‘विकासगाथा’ साकारली नसती़ आई-वडीलात जसा आम्ही आमचा देव पाहिला तशीच आमची पुढची पिढी देखील आचरण करीत आह़े
आई राजकारणात नाही, पण समाजकारणात आह़े शिरपुरातल्या सामाजिक व धार्मिक कार्यात तिला सहभागी होण्यास आनंद वाटतो़ कार्यक्रमातून परतल्यानंतर आज तेथे काय-काय झाले ते फोनवरून सांगत़े आजही ती बालाजी मंदिरात दर्शनासाठी नियमित जात़े त्यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असलो तरी आईजवळच असल्याचा आनंद मिळतो़
सण, उत्सव, वाढदिवस, पुण्यस्मरणनिमित्त सर्व पटेल कुटुंब एकत्र येते, तेव्हा आईला भरलेला संसार पाहून आनंद वाटतो़ तिचे नातवांवरही तितकेच प्रेम आह़े पंतवंडे तर तिच्या अंगावरच खेळतात़ संपूर्ण कुटुंबाचा सुत्रधार आज मी असलो तरी माझा सुत्रधार माझी आईच आह़े आईची इच्छाशक्ती मजबूत आहे, देव तिला दीर्घायु. आरोग्य देवो़
आईबद्दल खूप बोलता येईल, तरी ते पूर्ण झाले असे वाटणार नाही़ तिची अजून खूप सेवा करायला मिळावी, ही इच्छा आई़ मातृदिनानिमित्त आईला शिरसाष्टांग नमस्काऱ

Web Title: Mother's teachings of hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.