खासगी चेक पोस्ट नाक्याला मोटार असोसिएशनचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 02:28 PM2023-04-10T14:28:06+5:302023-04-10T14:28:36+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर, ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा
कुंदन पाटील, जळगाव: राज्य शासनाने रावेरसह राज्यात पाचठिकाणी अदानी गृपच्यावतीने खासगी चेक पोस्ट नाके सुरु केले आहेत. या चेक पोस्ट नाक्यांना जिल्हा मोटार ओनर्स ॲण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनने विरोध दर्शविला आहे. चेक पोस्ट नाके बंद न केल्यास ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा असोसिएशनने दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना असोसिएशनने निवेदन सादर केले आहे.खासगी यंत्रणेद्वारे वाहनचालकांची लूट करण्याचा घाट रचण्यात आाल आहे. तसेच केंद्र शासनाने आरटीओ चेक पोस्ट नाके बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य शासनाने नेमलेल्या समितीने चेक पोस्ट नाके बंद करण्यासंदर्भात सकारात्मक अहवाल दिला आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातील चेक पोस्ट नाका बंद करावा. अन्यथा ‘चक्का जाम’सह आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा असोसिशएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जसपालसिंग बग्गा, उपाध्यक्ष करणजीतसिंग सैनी, अशोक वाघ, राधेशाम व्यास, अरुण दलाल, महेंद्र अबोटी आदी उपस्थित होते.