अभाविपचे नूतन मराठा महाविद्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 05:54 PM2017-06-22T17:54:33+5:302017-06-22T17:54:33+5:30
निशुल्क वाहनतळाची व्यवस्थेसह विद्याथ्र्याच्या सोयीसाठी 4 खिडक्या सुरु करण्याची मागणी
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.22 : नूतन मराठा महाविद्यालयामध्ये विद्याथ्र्याच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) या महाविद्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले. प्राचार्यानी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या होत्या मागण्या
या महाविद्यालयामध्ये विद्याथ्र्याना नि:शुल्क वाहनतळ असावा, बँकेमध्ये चार खिडक्या सुरू कराव्यात, विद्याथ्र्यासाठी स्वच्छतागृह असावे, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांबाबत प्राचार्य एल.पी. देशमुख यांच्याकडे तीन वेळेस यापूर्वी निवेदन दिले. तसेच बुधवारी विद्याथ्र्याची स्वाक्षरी मोहीम राबविली. या मोहिमेनंतर गुरुवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर मार्ग निघाला
प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी आंदोलनाची दखल घेऊन बँकेत तीन खिडक्या सुरू करू, नि:शुल्क वाहनतळ देऊ व सुरक्षा रक्षकाची नेमणूक करू, असे सांगून त्याबाबत तत्काळ निर्णय घेतले. याबाबत अभाविपने आनंद व्यक्त केला.
या आंदोलनामध्ये महानगर सहमंत्री रिद्धी वाडीकर, महानगर सहमंत्री शिवाजी भावसार, सोहम पाटील, श्रीकांत पवार, समृद्धी देशपांडे, कविता ठाकरे, रितेश चौधरी, निखिल आखडकर, आदित्य करंजे, शुभम क्षत्रिय, सागर बाविस्कर, आकाश बारी, किरण बाविस्कर, भारत भोई यांनी सहभाग घेतला. उपप्राचार्य आर.बी.देशमुख, एस.बी.पाटील, डी.पी.पवार यांनी विद्याथ्र्याच्या अडचणी समजून घेतल्या.