जळगाव जि.प.चा बंद पडलेला छापखाना सुरू करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:23 PM2018-09-12T12:23:52+5:302018-09-12T12:24:36+5:30

७० लाखाचा खर्च अपेक्षित

Movement of closed printing press of Jalgaon District | जळगाव जि.प.चा बंद पडलेला छापखाना सुरू करण्याच्या हालचाली

जळगाव जि.प.चा बंद पडलेला छापखाना सुरू करण्याच्या हालचाली

Next
ठळक मुद्देस्थायी समितीच्या सभेत ठेवणार विषयजुनी मशीनरीची होणार विक्री

जळगाव : जिल्हा परिषदेचा बंद पडलेला छापखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदीसाठी ७० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार छापखान्यासाठी २०१८ - १९ या आर्थिक वर्षात ७० लाख रुपये खर्चाची तरतूद करण्याचा ठराव ११ रोजी छापखाना समितीच्या सभेत करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या छापखाना समितीची सभा ११ रोजी सानेगुरूजी सभागृहात समितीचे अध्यक्ष जयपाल बोदडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सदस्य रावसाहेब पाटील, प्रभाकर सोनवणे, रवींद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आदी उपस्थित होते. समितीच्या सभेत ७० लाख रूपयांची तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले असून या विषयास मंजूरी मिळविण्यासाठी तो जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.
जुनी मशीनरीची होणार विक्री
तरतूद झाल्यानंतर आॅफसेट मशिन यंत्रणा तसेच इतर आवश्यक मशिनरी खरेदीची प्रक्रिया ही निविदा पद्धतीने राबविण्याचे ठरविण्यात आले. छापखान्यातील असलेली जुनी मशीनरी लिलाव पद्धतीने विक्री करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवृत्त कर्मचारी
छापखाना व्यवस्थितपणे चालविण्यासाठी कार्यकारी व्यवस्थापक तसेच व्यवस्थापक पदावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांची निवड करण्यात आली. तसेच छापखान्याचे व्यवस्थापन व कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी याच विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी सैय्यद जमील यांची सहायक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्याचे निश्चित करण्यात आले.

Web Title: Movement of closed printing press of Jalgaon District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.