प्रतिमा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली
By admin | Published: February 8, 2017 12:24 AM2017-02-08T00:24:19+5:302017-02-08T00:24:19+5:30
भुसावळ पं़स़ : गटविकास अधिकाºयांचे पोलिसांना पत्र
भुसावळ : भुसावळच्या पंचायत समितीतील प्रतिमा हटवणे प्रकरण तापले असतानाच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात शहर पोलिसांना मंगळवारी सायंकाळी पत्र दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे़
विशेष म्हणजे या पत्रात अज्ञात व्यक्तींनी प्रतिमा हटवली व लावली असा उल्लेख असल्याने गटविकास अधिकारी नेमके कुणाला वाचवत आहेत? असा प्रश्न समाजमनातून उपस्थित होत आहे़
घटनेची पार्श्वभूमी
कुºहे गणातून आमदारांनीच तिकीट कापण्याचा समज झाल्याने नाराज झालेल्या पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरींनी ४ रोजी त्यांच्या दालनातून आमदार संजय सावकारेंची प्रतिमा हटवली होती़ या प्रकारानंतर ६ फेब्रुवारी रोजी राजेंद्र चौधरींनी सावकारेंची प्रतिमा काढलेल्या जागी पक्षावरच प्रेम असल्याचे दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावली होती तर त्याच्या काही वेळानंतर पं़स़उपसभापती मुरलीधर पाटील, माजी सभापती व पं़स़सदस्या मंगला झोपे, पं़स़सदस्य मनीषा पाटील, तळवेलचे सरपंच ज्ञानदेव झोपे यांनी मोंदीच्या प्रतिमेशेजारीच आमदार संजय सावकारेंची प्रतिमा लावून नेत्यांवरील निष्ठा व्यक्त केली होती़
याप्रसंगी किन्ही ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कोळी, तळवेलचे कांता पाटील, सोपान पाटील, अशोक सोपान पाटील, अर्जुन इंगळे, अमोल महाजन, भालचंद्र पाटील, दत्तू भोळे, नारायण कोळी आदींची उपस्थिती होती़
गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली
आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांनी मंगळवारी दिवसभर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एकनाथ पाडळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाडळे येथे कामानिमित्त जळगावात असल्याने त्यांची भेट झाली नाही़
गटविकास अधिकाºयांवर राजकीय दबाव ?
४निवडणुकीसाठी वातावरण तापले असतानाच प्रतिमा प्रकरणाने राजकारणात आणखीन रंगत आली आहे़ पंचायत समिती सभापती दालनातून आधी कुणी कुणाची प्रतिमा हटवली त्यानंतर कुणाची प्रतिमा लावण्यात आली याबाबत सचित्र वृत्त वृत्तपत्रांमध्ये त्या-त्या पदाधिकाºयांच्या नावासह प्रसिद्ध झाले आहे़ असे असतानाही गटविकास अधिकाºयांनी प्रतिमा हटवणाºया व लावणाºया अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हणजे राजकीय दबावातून संशयीतांना बगल देण्याचा प्रकार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये, असे समाजमनातून बोलले जात आहे़
पंचायत समितीत प्रतिमा लावणाºया व बदलणाºया व्यक्तींविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात शहर पोलिसांना पत्र दिले आहे़ प्रतिमा कुणी बदलल्यात हे आम्हाला माहित नाही़ कुठलाही राजकीय दबाव नाही़
-सुभाष मावळे, गटविकास अधिकारी, भुसावऴ