धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे वनविभागाला माकडांची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:05 AM2019-09-18T00:05:21+5:302019-09-18T00:06:49+5:30
नांदेड येथील गाव व परिसरात माकडांचा उपद्रव आहे.
नांदेड, ता.धरणगाव, जि.जळगाव : येथील गाव व परिसरात माकडांचा उपद्रव सुरू असून, माकडांना पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत आहे.
उन्हाळ्यापासून येथे गाव व परिसरात आलेल्या चार-पाच माकडांकडून सारखा उपद्रव सुरू आहे. गुराढोरांसह शेळ्या मेंढ्यांना कडाडून चावा घेऊन रक्तबंबाळ करणे, नागरिकांच्या कानशिलात लगावणे व उभ्या असलेल्या मोटारसायकली लाथेने आडव्या पाडणे असे प्रकार माकडांकडून नित्याचेच सुरू आहेत. याबाबत १० रोजी ‘लोकमत’मध्ये ठळक वृत्त प्रसिद्घ झाल्यानंतर वनविभागाने दखल घेतली.
दि.१६ व १७ अशा दोन दिवसांपासून वनविभागाच्या पथकाने सापळे लावून माकडांचा शोध घेतला. परंतु माकडे हाती लागत नाही. यामुळे वनविभागाच्या पथकाला खाली हाताने परतावे लागत आहे.