आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 06:04 PM2020-08-08T18:04:31+5:302020-08-08T18:04:50+5:30
आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांनी सरकारच्या आयुध निर्माणी निगमिकरण निर्णयाविरोधात ८ रोजी देशव्यापी ‘आयुध निर्माणी बचाव दिवस’ साजरा केला
भुसावळ : येथील आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांनी सरकारच्या आयुध निर्माणी निगमिकरण निर्णयाविरोधात ८ रोजी देशव्यापी ‘आयुध निर्माणी बचाव दिवस’ साजरा केला व एका दिवसाचा उपवास ठेवून दुपारच्या जेवणावर बहिष्कार घातला.
संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात सकाळी सर्व कामगार एकत्र येत शनिवारी मुख्य गेटवर कामावर जातेवेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी व प्रदर्शन करून सरकारचे लक्ष वेधण्याता प्रयत्न केला. तसेच ९ आॅगस्ट ‘भारत छोडो आंदोलन’ रविवारी सुटी असल्याने आजचे निमित्त साधून भारत बचाव दिनही साजरा करण्यात आला.सर्व कर्मचाऱ्यांनी दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकला. प्रकाश कदम, दिनेश राजगिरे यांनी मार्गदर्शन केले.
स्थानिक संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने किशोर पाटील, नवल भिडे, एम.एस.राऊत, किशोर चौधरी, अनिल सोनवणे, के.बी.राजपूत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.