यावल येथे शिक्षक संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2017 05:21 PM2017-04-25T17:21:59+5:302017-04-25T17:21:59+5:30

प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले

Movement of teacher organization at Yaval | यावल येथे शिक्षक संघटनेचे आंदोलन

यावल येथे शिक्षक संघटनेचे आंदोलन

googlenewsNext

 यावल,दि.25- नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना पुन्हा सुरू करावी तसेच सातव्या वेतन आयोगाने सुचविलेल्या योजनांच्या  अम्ांलबजावणी साठी येथील तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले ़

मागण्यांचे  निवेदन प्रभारी तहसीलदार सुनील समदाने  यांना देण्यात आल़े पेंशन योजनेच्या मागण्यासाठी तालुक्यातील बहुतेक राज्य कर्मचारी संघटनेने शिक्षक संघटनेस पाठींबा दिला आहे. 
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक शे. असलम शे. नबी, सुधाकर धनगर यांनी आंदोलनस्थळी  भेट देऊन पाठिंबा दिला. संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत मोटे व पदाधिकारीसह तालुक्यातील शिक्षक वृंद उपस्थित होते. आंदोलनास आदिवासी विभाग कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, माध्य. शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, कास्ट्राईब संघटना, शिक्षक सेवा  संघ यासह अनेक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.     

Web Title: Movement of teacher organization at Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.